येरमाळा/तेराणेचा छावा
येरमाळा येथील पोलिस स्टेशनचे कर्मचारी रात्रगस्त करत असताना 19 एप्रिल रोजी मध्यरात्री 12:30 सुमारास त्यांना एक महिला एकटीच आढळून आली माणुसकीच्या नात्याने एकटेच महिलेला त्यांनी तसेच न सोडता येरमाळा पोलिस स्टेशन ला आणून महिला आधार केंद्रात पाठवून दिले.
याविषयी सविस्तर असे की दिनांक 19 .4 .2021 रोजी रात्रगस्त दरम्यान 0030 वा सु पीएसआय राडकर व पोह/397 राठोड असे पेट्रोलिंग करत असताना येरमाळा चौरस्ता येथे कु पूजा मनोहर राजभर वय 19 वर्ष ही निराधार महिला मिळून आल्याने करोना काळात वाहतूक व्यवस्था बंद असल्याने तिला एकटे सोडणे उचित नसल्याने पोलीस स्टेशन येरमाळा येथे आणुन महिला पोलिसांच्या ताब्यात दिले. त्यानंतर सकाळी आजूबाजूच्या परिसरात तिच्या नातेवाईकांचा शोध घेतला परंतु ती सांगत असलेल्या पत्त्यावर कोणीही नातेवाईक मिळून आले नाहीत. तिला परत पोस्टे आणून सविस्तर विचारपूस केली असता ती कधी राहण्याचा पत्ता बनारस, मुंबई,पुणे असा वेगवेगळा सांगत असल्याने सदर महिला ही निराधार असून तिला आश्रयाची व समुपदेशनाची गरज असल्याने तिला तिची कोरोना संदर्भाने रॅपिड टेस्ट करून वन स्टॉप सेंटर उस्मानाबाद येथे दाखल केले. तेथील अधीक्षक मुळे मॅडम यांनी तीचे समुपदेशन केले परंतु तिचे घरचा पत्ता तिला सांगत आला नाही, कुठलाही मोबाईल नंबर सांगता आला नाही, तिचे आधार कार्ड नसल्याने तिला आज दिनांक 20.4.21 रोजी महिला पोलीस व पोह/328 रोकडे यांचे मदतीने खाजगी वाहनाने लातूर येथील शासकीय महिला वसतिगृह येथे तेथील अधीक्षकांना संपर्क करून दाखल केले व सदर निराधार महिलेस आश्रय मिळवून दिला तिचे नातेवाईकाचा शासकीय वस्तीगृह लातूर येथील अधिकारी कर्मचारी समुपदेशन करून शोध घेत आहेत.सदरची कामगिरी श्री विशाल खांबे एसडीपीओ भूम चार्ज कळंब यांचे मार्गदर्शनाखाली एपीआय गणेश मुंडे , पीएसआय राडकर पोह/397 राठोड पोह/328 रोकडे मपोशि/1498 मुळे यांनी केली आहे.
या घटनेमुळे येरमाळा पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांचे परिसरातून कौतुक होत आहे.
0 Comments