Subscribe Us

मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्याची मागणी.


     मलकापुर/तेरणेचा छावा :-मलकापुर तालुका कळंब येथील कोरडवाहू शेती विकास अभियान अंतर्गत (आर ए डी )सर्व पारदर्शक पणे ड्रॉ काढून 25 शेतकरी लाभार्थ्यांची निवड केली. यामध्ये 20 शेतकरी सर्वसाधारण व 5 शेतकरी मागासवर्गीय (अनुसूचित- जाती जमाती) या योजने अंतर्गत गाई खरेदी झाल्या व संबंधित कृषी विभाग मार्फत सर्व साधारण  शेतकरी लाभार्थ्यांना अनुदान 1 महिन्यापूर्वी वाटप केले. व 5 मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित ठेवलेले आहे. अद्याप पर्यंत त्यांना अनुदान वाटप झालेले नाही. शासन वंचित व त्रस्त मागासवर्गीय  शेतकऱ्यासाठी काम करते परंतु यामध्ये कृषी विभाग विभागाचे हाय व टाळाटाळ करत आहे तरी मागासवर्गीय शेतकऱ्यांना अनुदान वितरण चे आदेश देऊन या कामी टाळाटाळ करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई करण्याची मागणी भ्रष्टाचार निर्मूलन समिती कळंबचे सुधीर पायाळे यांनी मंगळवार(दि20 एप्रिल) रोजीजिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Post a Comment

0 Comments