-
येरमाळा/तेरणेचा छावा:-कुलस्वामीनी आई तुळजाभवानी मातेची धाकटी बहीन आराध्यदैवत आई येडेश्वरी देविचा चैञ पौर्णिमा याञा महोत्सव २०२१ हा रद्द करण्यात निर्णय स्थानिक प्रशासन, देवस्थान ट्रस्ट व महसुल विभाग यांनी संयुक्त बैठकिमध्ये घेण्यात आला असुन भाविकांनि यांची दखल घ्यावी असे आव्हान करण्यात आले.
दि.२२ रोजी दु .3.३०वा. ग्रामपंचायत कार्यालयात स्थानिक प्रशासन व महसुल विभाग व देवस्थान ट्रस्ट यांच्याकडून बैटकीचे आयोजन करण्यात आले होते या बैटकीमध्ये सध्या जगभरात कोरोना संसर्गाने थैमान घातले असुन दि. २७ एप्रिल ते १ मे दरम्यान येडेश्वरी देविचा चैञ पौर्णिमा याञा महोत्सव साजरा करण्यात येणार होता,या याञेसाठी महाराष्टाच्या कानाकोपर्यातुन लाखो भाविक येरमाळा नगरीमध्ये दाखल होत असतात.पंरतु कोरोना व्हायरसच्या भितीने धार्मिक स्थळे,बाजारपेठा,शाळा,तसेच गर्दीचि ठिकाणी येणार्या भाविक,नागरिकांना एकञ येण्यास शासनाने बंधने घातली आहेत पंरतु याञेसाठी तर लाखो भाविक येरमाळा नगरीदाखल होतात यावेळि कोरोनाचा प्रार्दुभाव(संसर्ग) वाढला तर आटोक्यात येणे शक्य नसल्याने ग्रामस्त,भाविक,प्रशासनाने एकञ चर्चा करुण होणारा चैञ पौर्णीमा याञामहोत्सव रद्द करण्यात आला असुन देविची पालखी मंदीराहुन न येता मंदीरावरच राहणार असल्याने व याञेतिल धार्मिक विधिवत महापुजा मुख्य मंदीरामध्ये (डोंगरावर) करण्यात येणार असल्याने याञेतील मुख्य कार्यक्रम चुना वेचणे रद्द झाला आहे तसेच दरम्यानच्या काळात पायरीचे ही दर्शन भाविकांना घेता येणार नसल्यामुळे भाविकांनी याञेला येणाचा मोह टाळावा तसेच दिनांक २७व२८ एप्रिल रोजी येरमाळा येथील वैद्यकीय यंत्रणा व सुविधा सह शासकीय कार्यलय वगळता सर्व आस्थापना बंद राहतील. तसेच स्थानिक यंत्रणेच्यावतीने प्रसंगी युवकांचे व स्वयंसेवकांचे पथक नेमून वरील नियम न पाळणारे यांच्यावर नियमानुसार कडक कार्यवाही करण्यात येईल असेही ठरवण्यात आले या प्रसंगी बैठकीमध्ये पोलिस उपनिरीक्षक राडकर साहेब, सरपंच तबस्सुम सय्यद, उपसरपंच गणेश बारकुल, माजी सरपंच तथा सदस्य विकास बारकुल, मंडळ अधिकारी डी एम कांबळे, ग्रामविकास अधिकारी आमले साहेब, तलाठी एस आर सय्यद व मंदिर देवस्थानचे पदाधिकारी तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.तसेच कोरोना संसर्ग होवु नये यासाठी प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट,ग्रामपंचायत कार्यालय यांच्याकडून करण्यात आले.
0 Comments