Subscribe Us

ऑक्सिजन प्रकल्पास लागणारी ना हरकत परवानगी मिळाली - खासदार ओमराजे निंबाळकर


उस्मानाबाद/तेरणेचा छावा:-जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ऑक्सिजन सुविधेसह जिल्ह्यातील एकमेव उपचार केंद्र असून हा ऑक्सिजन प्रकल्प ७७०० घनमीटर क्षमतेचा आहे, हा प्रकल्प परवाना आणि ना हरकत प्रमाणपत्र न दिल्या मुळे चालू झालेला नव्हता. दि.16 एप्रिल रोजी संयुक्त मुख्य विस्फोटक नियंत्रक, विस्फोटक विभाग, भारत सरकार यांना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्र देऊन ना हरकत प्रमाणपत्र देण्याची विनंती केली होती. व सातत्याने पाठपुरावा चालू होते. या अनुषंगाने आज परवानगी मिळाली आहे.
        आज सामान्य रुग्णालय, उस्मानाबाद येथे खासदार ओमराजे निंबाळकर, आ.कैलास घाडगे-पाटील, डॉ.जयप्रकाश राजेनिंबाळकर, जिल्हाधिकारी कोस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले, जिल्हा शल्यचिकित्सक डी.के.पाटील यांनी भेट दिली. हा प्रकल्प १० के.एल. क्षमतेचा असून तो कार्यान्वित करण्यासाठीच्या चाचण्या यापूर्वीच पूर्ण झाल्या होत्या. आज आवश्यक त्या परवानग्या व ना हरकत प्राप्त झाल्यानंतर लिक्विड ऑक्सिजन भरून आज पासून हा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. 
या प्रकल्पाद्वारे सध्या ३५० रूग्णांना ऑक्सिजन पुरविला जाऊ शकतो. या उपचार केंद्रात नवीन ४० खाटांची संख्या वाढविण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील रुग्णांवर सहज उपचार करता येतील व सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. 


Post a Comment

0 Comments