Subscribe Us

तेर येथे कृषिदुतांकडून कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा



तेरणेचा छावा/धाराशिव:- 
कृषी महाविद्यालय आळणी (गडपाटी), कृषिदुतांकडून तेर  येथे  महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.वसंतराव नाईक यांच्या जन्मदिवसानिमित्य 1 जुलै हा दिवस कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.  
   कृषी महाविदयालय आळणी (गडपाटी) च्या विर्द्यात्यांनी ग्रामीण जागरुकता कार्यानुभव कार्यक्रम आणि सालाना उपक्रम अंतर्गत सातव्या सत्रातील विद्यार्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला. कृषी दिनानिमित तेर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेतील विद्यार्थी, शिक्षकवृद व ग्रामस्थाना मा. वसंतराव नाईक यांची कामगीरी व वृक्षरोपणाचे महत्व सांगून प्रभातफेरीद्वारे जनजागृती केली. कृषिदिनानिमीत्य महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील भरीव योगदान व त्यांचे उल्लेखनिय कार्यामुळे महाराष्ट्र हा अन्नधान्यासाठी स्वयंपूर्ण कसा झाला विद्यार्थ्यांना व गावकऱ्यांना पटवून दिले. तसेच शाळेतील मुख्यध्यापक पाडोळे  यांनी तरुण पिढिणे शेतीकडे वळावे व सेंद्रिय शेती करण्याबाबत मार्गदर्शन केले.
     सदरील कार्यक्रमासाठी गावची सरपंच दीदी लोकेश काळे, ग्राम सेवक बाबासाहेब खोचरे, कृषी सय्यक राम व्यंकट शिंदे, जिल्हा परिषदेच्या केंद्र प्रमुख पडवळ,प्राचार्य डॉ.के.एच. पाटील यांनी सहभाग नोंदवला.
जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक गोरोबा पडोळे  व सहशिक्षकवृंद यांनी कार्यक्रम पार पाडण्यास अत्यंत मोलाचे सहकार्य केले, कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रम समन्वयक प्रा.शेटे सर,कार्यक्रम अधिकारी  अक्षय शिंदे, प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील व प्रा.प्रविण माळी यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमामध्ये सातव्या सत्रातील कृषिदूत प्रणय कोकाटे, जगदिश बसाटे, रमन घोरपडे, अशोक यादव, अमोल मायकर, साहिल सांगुळे व संकेत सांगुळे  यांचा सहभाग होता.

Post a Comment

0 Comments