Subscribe Us

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था.परिवहन मंत्री प्रताप सरनाईक


तेरणेचा छावा/मुंबई विशेष वृत्त :  आषाढी एकादशी निमित्त श्री.क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे.ह्या बसेस घेऊन येणारे चालक,वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा,नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे.अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.
       मंत्री सरनाईक म्हणाले,गेली कित्येक वर्ष विठुरायाच्या भक्तांची सेवा एसटी व एसटीचे कर्मचारी सातत्याने करत आहेत.ऊन,वारा पाऊस याची तमा न बळगता अतिशय निष्ठेने त्यांचे कर्तव्य ते बजावत असतात.आषाढी वारीच्या काळात त्यांच्या जेवणाची आभाळ होऊ नये,म्हणून यंदा स्वखर्चाने मी सलग तीन दिवस या सर्वांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था (एकादशीला उपवासाचे पदार्थ) करीत आहे.या निमित्ताने माणसातील " विठुराया" ची सेवा करण्याची संधी मला मिळत आहे.अर्थात,हे पुण्य पैशात मोजण्यासारखे नाही.त्यामुळे दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम मी राबवणार आहे.असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी यावेळी केले.
        आषाढी वारीच्या काळात ५,६ व ७ जुलै रोजी चंद्रभागा बसस्थानक, भिमा बसस्थानक,विठ्ठल बसस्थानक व पांडुरंग बसस्थानक येथे सुमारे १३ हजार एसटी कर्मचारी या मोफत भोजन व्यवस्थेचा लाभ घेतील.
                   

Post a Comment

0 Comments