Subscribe Us

गाव तिथे बुद्ध विहार. कैलास शिंदे यांची मंत्री संजय शिरसाठ यांच्याकडे मागणी


तेरणेचा छावा/धाराशिव:- 
गाव तेथे बुद्ध विहाराच्या निर्मिती साठी राज्याच्या वतीने आर्थिक निधी उपलब्ध करून देऊन गावोगावी बुद्ध विहार व संस्कार केंद्रास निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी उपाध्यक्ष कैलास शिंदे यांनी राज्याचें सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांच्या कडे केली आहे.मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली.
या वेळी धाराशिवचे विशाल शिंगाडे, सांगलीचे सिद्धार्थ माने,कोल्हापूरचें प्रमोद कदम,यांच्या शिष्टमंडळाने मुंबई येथे सामाजिक न्याय मंत्री संजय बनसोंडे यांची भेट घेतली.राज्यातील बौद्ध समाजात नागरिकांना लहान मुलांना व महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बौद्ध शिकवण महत्वाची असून प्रत्येक ठिकाणी विहाराच्या निर्मितीतून धम्म संस्कार,शिक्षण संस्कार होऊन शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासात रुची निर्माण करून समाजाच्या विकासासाठी जास्तीचा निधी उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी केली. मंत्र्यांनी या सकारात्मक बाबीला अनुकूलता दर्शविली असून यांची अंमलबजावणी करण्याची हमी दिली असल्याची माहिती कैलास शिंदे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments