Subscribe Us

श्री सिद्धीविनायक परिवाराच आणखी एका नव्या उद्योगात यशस्वी पदार्पण, येरमाळा येथे सीएनजी पंप सुरु.

 
विश्वासातून प्रगतीकडे यशस्वी वाटचाल.
तेरणेचा छावा/येरमाळा:- येथील श्री सिद्धिविनायक परिवाराच्या पेट्रोल पंपावर पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सीएनजी इंधनाची सुविधा उपलब्ध झाली आहे. श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते व श्री.विकास बारकुल, श्री.मदन बारकुल, श्री.खंडेराव मैंदाड यांच्या उपस्थिती मध्ये हा समारंभ पार पडला.

सीएनजी इंधनाच्या उपलब्धतेमुळे स्थानिक वाहनचालकांना स्वच्छ, पर्यावरणपूरक आणि किफायतशीर इंधनाचा लाभ मिळेल. श्री सिद्धिविनायक परिवाराने या नव्या सुविधेसाठी पुढाकार घेतल्याबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

सीएनजी इंधनाच्या वापरामुळे कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरण संरक्षणास हातभार लागेल. तसेच, पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी अधिक किफायतशीर असल्याने वाहनचालकांच्या इंधन खर्चात बचत होईल. 

सर्व सीएनजी वाहन धारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सिद्धिविनायक परिवारातर्फे करण्यात येत आहे.

यावेळी श्री.मकरंद पाटील, श्री.शिवाजीराव गिड्डे पाटील, श्री.बालाजी कोरे, श्री.गणेश कामटे, श्री.धनंजय गुंड, श्री.मंगेश कुलकर्णी, श्री.राजेश पौळ आणि परिवारातील इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments