Subscribe Us

खा राजेनिंबाळकर व आ पाटील यांच्या हस्ते रमजान ईदनिमित्त साहित्य वाटप



तेरणेचा छावा/धाराशिव :- पवित्र रमजान ईदनिमित्त मुस्लिम समाजातील गोरगरीब कुटुंबांना रमजान ईद सणासाठी लागणार्‍या साहित्याच्या किटचे वाटप खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते दि.३० मार्च रोजी करण्यात आले.
धाराशिव शहरातील ख्वॉजा नगर भागात सामाजिक कार्यकर्ते अबरार मोबीन कुरेशी यांच्यावतीने या किटचे वितरण करण्यात आले. या किटमध्ये शिरकुंबा तयार करता यावा यासाठी काजू, बदाम, इलायची, बडीशेप, साखर, पिस्ता, खरबुज बिया, शेवया, दूध आदींसह इतर साहित्याच्या किटचे वाटप खा राजेनिंबाळकर व आ पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अबरार मोबीन कुरेशी, खलील सय्यद, खलीफा कुरेशी, कलीम कुरेशी, आयाज काझी, इम्तियाज बागवान, खालेद कुरेशी, उमर कुरेशी, छोटू बागवान, कालू बागवान, शहबाज पठाण, इस्माईल शेख, हसान कुरेशी, बबलू शेख आदींसह महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments