Subscribe Us

दंगलमुक्त समाज घडविण्यासाठी व माणस जोडण्यासाठी जिजाऊ रथयात्रा : सौरभ खेडेकर


तेरणेचा छावा/कळंब:-आपापसातला व सामाजिक स्तरावर संवाद तुटत चालला असून यामुळे समाजामध्ये मोठ्या प्रमाणात नैराश्याचं वातावरण निर्माण झालं आहे. बेरोजगारी व विवाह विवाहाचा गंभीर प्रश्न याचा फायदा घेऊन तरुण युवकांचा दंगलीसाठी वापर केला जात आहे. ही राष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत घातक बाब आहे. दुभंगलेला समाज मनाने जोडला जावा व सामाजिक सलोखा राखला जावा यासाठी ही जिजाऊ रथयात्रा आयोजित केली असल्याचे मत संभाजी ब्रिगेडचे राष्ट्रीय महासचिव शिवश्री सौरभ खेडेकर यांनी व्यक्त केले.
     कळंब येथे मराठा सेवा संघ आयोजित जिजाऊ  रथयात्रेचे शिवस्वागत व मार्गदर्शन सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी मराठा सेवा संघाचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा अर्जुन तनपुरे, मराठा सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष शाहीर पाटील, संभाजी ब्रिगेडचे गजानन पारधी, जिजाऊ ब्रिगेडच्या सहसचिव आशाताई मोरजकर, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक ताई बोराडे, जिल्हाध्यक्ष रेखाताई पवार, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष महेश भगत ,प्रा.डॉ.संजय कांबळे, डॉ.संदीप तांबारे,ह भ प महादेव महाराज अडसूळ, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक अतुल गायकवाड,जिल्हाध्यक्ष तानाजी चौधरी, दत्ता कवडे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्ष प्रा. वर्षा जाधव, प्रा.प्रतिभा भवर, ज्योती सपाटे,भास्कर वैराळे,सचिन गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती.
    जिजाऊ रथयात्रेची सुरुवात शहरातील डॉ आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून करण्यात आली. शहरातील विविध चौकामध्ये शहरवासीयांनी या रथयात्रेचे मोठ्या उत्साहात स्वागत केलं. फ्रेंड्स फोरेएवर ग्रुप च्या वतीने या छत्रपती शिवाजी महाराज चौकात रथयात्रेचे पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले व सर्व जिजाऊ भक्तांना थंड मठ्ठाचे वाटप करण्यात आले. मुस्लिम बांधवांनी ही शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून रथयात्रेचे स्वागत केलं. या रथयात्रेमध्ये मराठा समाजासह सर्वच अठरापगड जातीचे लोक सहभागी होते. पुढे बोलताना खेडेकर म्हणाले की समाजामध्ये अनेक प्रश्न गंभीर होत असताना मराठवाड्यामध्ये मराठा आरक्षणाभोवती मराठा चळवळ फिरती आहे. मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे की मराठा सेवा संघाची 1990 ला भूमिका होती .निर्णय लवकर झाला असता तर समाजाच्या तीन पिढ्या वाचल्या असत्या. आज संधी कमी झाल्यात प्राप्त परिस्थितीमध्ये या समाजाने इडब्लूएसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही यावेळी त्यांनी केले. यावेळी शिवश्री तनपुरे यांनी सामाजिक सलोख्यासाठी युवकांना दंगली पासून वाचवण्यासाठी या रथयात्रेचे आयोजन केल्या असल्याचं आपल्या भाषणात नमूद केले.
           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा जगदीश गवळी यांनी , प्रास्ताविक संदीप शेंडगे यांनी तर आभार अतुल गायकवाड यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठा सेवा संघाचे प्रा. जगदीश गवळी,दत्ता कवडे, अनिल फाटक ,अरविंद शिंदे, ज्ञानेश्वर कूरडे पाटील, बाबुराव शेंडगे, शिवानंद ढेंगळे, ऍड अशोक चोंदे, आबासाहेब साबळे,महेश कोळंपे अण्णा शिंदे,कवडे महाराज,शरद जाधव,ॲड.अशोक शिंदे,अमोल पवार विलास गुंठाळ,वीर भगतसिंग चे अक्षय मुळीक, आश्रुबा चोंदे,नितीन काळे शिवराज मराठे , प्रतीक गायकवाड आदीनी परिश्रम घेतले. सावित्रीबाई फुले विद्यालयाच्या व समर्थ विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम सादर करून या रथयात्रीची शोभा वाढवली. शहरभर ठीक ठिकाणी शोभेची दारू फटाकेबाजी करण्यात आली.

Post a Comment

0 Comments