कळंब /तेरणेचा छावा:-3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त तुळजाई प्रतिष्ठान बहुउद्देशीय संस्था पानगावचे सचिव शहाजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालय कळंब ता. कळंब जिल्हा धाराशिव येथे 3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त जनजागरण रॅली काढण्यात आली.
शालेय स्तरावर दि. 2 डिसेंबर 2024 रोजी शाळेतील मुलांच्या विविध स्पर्धा लांबवडी, गोळाफेक, धावणे, चित्रकला इत्यादी स्पर्धांचे आयोजन करून त्यांना शिक्षणाबरोबरच इतरही खेळामध्ये सहभागी होता यावे व त्यांच्या मनातील न्यूनगंड कमी करण्यासाठी समाजामध्ये मिळवून मिसळून राहण्यासाठी कळंब शहरातून तीन डिसेंबर रोजी सकाळी ठीक साडेआठ वाजता कळंब शहरातून विविध स्लोगन हातात घेऊन प्रभात फेरी काढण्यात आली. तसेच सकाळी दिव्यांगांचे श्रद्धास्थान असलेल्या डॉक्टर हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज निवासी मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाजी जाधवर, विशेष शिक्षक अश्रुबा कोठावळे, सुनिता गुंड, सुनंदा गायकवाड,लिपिक गोवर्धन चव्हाण,काळजी वाहक तुकाराम अडसूळ, शिपाई अंकुश गव्हाणे, स्वयंपाकी विशाल चोंदे व शाळेतील सर्वच कर्मचारी उपस्थित होते.
0 Comments