सहकार, समाजकारण आणि राजकारण याचा समतोल सांभाळणारे, शून्यातून विश्व निर्माण करणारे धाराशिव जिल्ह्यातील एकमेव नाव अशी ओळख सर्वसामान्यांमध्ये असलेले दत्ताभाऊ कुलकर्णी. 30 नोव्हेंबर त्यांचा जन्मदिवस जिल्हाभरात साजरा होत आहे. यानिमित्ताने त्यांच्या जीवनकार्याचा परिचय देण्यासाठी हा लेखप्रपंच..अगदी तरुण वयात लहान-मोठी कामे करताना सर्वसामान्यांचे दुःख, अडचणी अगदी जवळून पाहिल्याने परिवर्तनाची मशाल हाती घेऊन न थकता, न हरता त्वेषाने निघालेल्या एका तरुणाने धाराशिव शहरच नव्हे तर संपूर्ण धाराशिव जिल्ह्यात आज सहकार, पतपुरवठा, उद्योग, शेती, आरोग्य, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रात त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे. जनहिताचे कोणतेही कार्य मनापासून हाती घेतले तर त्यात यश मिळतेच. भले कितीही अडचणी आल्या तरी सर्वसामान्यांचे आशीर्वाद आणि सदिच्छांच्या सोबतीने त्यावर मात करता येते, याचे उदाहरण म्हणून धाराशिव जिल्ह्यात बँकिंग, आरोग्य, शेती, सहकार, उद्योग अशा विविध क्षेत्रात नावारुपाला आलेला सिद्धिविनायक परिवारकडे पाहता येईल. समोर आलेल्या प्रत्येक कार्यात स्वतः ला झोकून देऊन कोणतीही अपेक्षा न ठेवता, कोणत्याही प्रसंगात विचलित न होता इतरांना कायम सोबत घेऊन वाटचाल करणे आजकाल दुर्मिळ आहे. परंतु कोणताही राजकीय वारसा, उद्योजकीय पाठबळ नसताना केवळ जनसेवेचा वसा घेऊन निघालेल्या दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी ही किमया करुन दाखवली आहे.सहकार क्षेत्रापासून सुरुवात केलेल्या सिद्धिविनायक परिवारने अल्पावधीतच जनसामान्यांच्या विश्वासाला पात्र राहून कृषीक्षेत्रातही यशस्वी पाऊल ठेवले आहे. कुसळी माळरानाचा म्हणून ओळखल्या जाणार्या तुळजापूर तालुक्यात जलसंधारणाची कामे गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. त्यामुळे या भागात ऊसाचे क्षेत्रही वाढले आहे. ही गरज ओळखून दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सिद्धिविनायक अॅग्रीटेक इंडस्ट्रीज नावाने देवकुरळी गुळ पावडर कारखाना उभारुन इथल्या ऊस उत्पादक शेतकर्यांनाना मोठा आधार दिला, असे धाडस कोणी ध्येयवेडी व्यक्तीच करु शकते! या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वीपणे सुरू आहे तो केवळ दत्ताभाऊ यांच्यावरील विश्वासामुळेच. या कारखान्याचा गळीत हंगाम यशस्वी झाल्यानंतर ऑक्टोंबर महिन्यात पहिल्या गळीत हंगामाचा शुभारंभ माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली माजी विधान परिषद सदस्य सुजितसिंह ठाकुर यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. याच काळात कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे देखील दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी सिद्धीविनायक परिवारात आणखी एका कारखान्याची उभारणी केली. त्यामुळे आणखी एकाम कारखान्याची भर पडल्याने ऊस उत्पादक शेतकर्यांची गैरसोय दूर झाली आहे. दोन कारखान्यांमुळे ऊस उत्पादक शेतकर्यांच्या अपेक्षा देखील त्यांच्याकडून वाढल्या आहेत. तुळजापूर तालुक्यात असलेल्या एकमेव सहकारी साखर कारखान्याव्यतिरिक्त अन्य एक साखर कारखाना उभारला गेला तरी या भागातील ऊस क्षेत्र देखील वाढत गेल्याने शेतकर्यांची परवड कायम होती. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झाल्यास अनेक शेतकर्यांचीची मोठी अडचण होत होती. अतिरिक्त ऊसाचा प्रश्न निर्माण झालेला असताना दत्ताभाऊ यांनी शेतकर्यांची अडचण लक्षात घेऊन चाचणी हंगामाच्या काळात देखील सुमारे 62 हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप करून ऊस उत्पादकांना मोठा दिलासा दिला. त्याचबरोबर कळंब तालुक्यातील शेतकर्यांना देखील सिद्धीविनायक ग्रीनटेकमुळे आपल्याच भागात ऊस पाठविण्याची सोय झाली आहे. परिणामी तोडणी वगळता वाहतुकीच्या खर्चातही बचत होत आहे. सिद्धिविनायक परिवारने वैद्यकीय क्षेत्रातही पाऊल टाकले आहे. सिद्धिविनायक परिवारच्या रुग्णालयाची मुहूर्तमेढ लवकरच रोवली जात असून धाराशिव जिल्ह्यातील गोरगरीच कुटुंबातील रुग्णांना अत्युच्च दर्जाची सेवा आणि उपचार धाराशिव येथे मिळू शकणार आहेत.सहकार, समाजकारण आणि राजकीय प्रवासात वाटचाल करत असताना भारतीय जनता पार्टीमध्ये दत्ताभाऊ सुरुवातीपासूनच तन-मन-धनाने वाटचाल करत आलेले आहेत. सर्वांना सोबत घेऊन वाटचाल करण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे आज हजारो कार्यकत्यांची फळी धाराशिव जिल्ह्यात निर्माण झालेली आहे. त्यांची पक्षनिष्ठा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांना नेहमीच सन्मानाची वागणूक दिली. त्यांच्यावर धाराशिव जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारीही श्रेष्ठींनी सोपविली. या संधीचे सोने करत दत्ताभाऊ यांनी धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर पंचायत, ग्रामपंचायतींसह गावागावातील सोसायट्यांवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवून राजकीय क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी त्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले. त्यामुळेच महायुतीला समसमान यश मिळाल्याचे दिसून आले. सर्वसामान्यांच्या प्रश्नांची समस्यांची जाण असलेले राजकारणापलिकडे जाऊन मैत्री जोपासणारे, शेती, सहकार, उद्योग, आरोग्य बासह विविध क्षेत्राच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देणारे दत्ताभाऊ कुलकणी यांना वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा कोटी-कोटी शुभेच्छा...
0 Comments