Subscribe Us

स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांची जयंती उत्साहात साजरी


धाराशिव/तेरणेचा छावा :-
अण्णासाहेब पाटील विकास फाउंडेशन धाराशिव च्या वतीने स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांची जयंती बुधवार (दि. 24 सप्टेंबर) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. 
    याप्रसंगी अण्णासाहेब पाटलांच्या कार्याची माहिती मराठा आरक्षणाबद्दल हमाल माथाडी चळवळीमध्ये अण्णासाहेबांनी केलेल्या कार्याचा उल्लेख फाउंडेशन चे जिल्हाध्यक्ष खंडू राऊत  यांनी सांगितला..
 येवेळी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पंडित आबा मुंडे व राजसिंह राजे निंबाळकर यांच्या हस्ते अण्णासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला यावेळी भारतीय मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संकेत सूर्यवंशी शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे माजी अध्यक्ष उष्ण इंगळे बलराज रणदिवे गणेश साळुंखे मुकुंद गाडगे बाबासाहेब साळुंखे महेश राऊत अब्दुल शेख उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments