धाराशिव/तेरणेचा छावा:-
महाराष्ट्र प्रदेश सहकार भारतीच्या शिर्डी येथे आयोजीत त्रैवार्षिक अधिवेशानामध्ये प्रदेश अध्यक्ष श्री दत्ताराम चाळके व महामंत्री श्री विवेक जुगादे यांनी संतोष तौर यांची सहकार भारतीच्या लातूर सहविभाग प्रमुख म्हणुन ३ वर्षासाठी निवड केली आहे यावेळी राष्ट्रीय महामंत्री डॉ उदय जोशी राष्ट्रीय संघटनमंत्री श्री संजय पाचपोर प्रदेश सह प्रमुख विजयराज देशमुख यांच्या उपस्थीत हि निवड बिनविरोध करण्यात आली यावेळी प्रदेश अध्यक्ष यांनी संतोष तौर यांचा सत्कार केला लातूर विभागात धाराशिव लातूर नांदेड बीड या चार जिल्ह्यांचा समावेश आहे.
संतोष तौर हे येरमाळा येथील जनहीत पतसंस्थेचे संस्थापक असून सहकार भारतीचे धाराशिव जिल्हा प्रमुख म्हणुन गेली ६ वर्ष त्यांनी कार्य केले आहे तसेच महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन मुंबई चे निमंत्रीत सदस्य आहेत त्यांना मिळालेल्या सहकार भारती सहप्रमुख पदाबद्दल त्याचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन होत आहे.
0 Comments