धाराशिव येथे शिवसैनिकांच्या बैठकीत सौ.पाटील यांच्या विजयाचा निर्धार
धाराशिव/तेरणेचा छावा:-
भारतीय जनता पार्टी, शिवसेना (बाळासाहेब ठाकरे), राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) आणि महायुती घटक पक्षाच्या अधिकृत उमेदवार सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या विजयाचा निर्धार शिवसैनिकांनी केला आहे.
धाराशिव येथे पोलीस मुख्यालयासमोरील साळुंके कॉम्पलेक्समधील शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांच्या संपर्क कार्यालयात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेण्यात आली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, उपजिल्हाप्रमुख आनंद वाघमारे लक्ष्मीकांत हुलजुते ,महिला जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते,युवासेना तालूकाप्रमुख ईश्वर शिंदे, मागासवर्गीय जिल्हाप्रमुख अमित बनसोडे, शहरप्रमुख गजानन चोंदे, कळंब युवासेना शहरप्रमुख कृष्णा हुरगट, धाराशिव युवासेना शहरप्रमुख सागर कदम, VJNT जिल्हाअध्यक्ष कमलाकर दाणे, शहर संघटक रणजीत चौधरी, उपशहरप्रमुख रजनीकांत माळाळे, दत्ता तिवारी, सरपंच नवनाथ सुरवसे,कृ.उ.बा.समिती संचालक संतोष पवार, ,कृ.उ.बा.समिती संचालक कोळगे, सरपंच किरण लगदिवे, फुलचंद गायकवाड, विजय शिंदे,अक्षय माळी, ॲड.शशांक सस्ते, अमर माळी, सुधाकर महाजन, अभिजीत देडे, सुनिल पाटील, प्रमोद करवर, अतुल इंगळे, विशाल जाधव, अशोक लोखंडे, सुमित गायकवाड, सुनिल जाधव, गुणवंत देशमुख, गोविंद आवाड, रवि गिरी, नितीन देवकते, ज्ञानेश्वर ठवरे, आबा देवकते, संतोष देवकते, योगेश तुपे, अजिंक्य आगलावे, सुरज राऊत, बबलू वंडरे, दिनेश तुपे, शुभम पांढरे, व्यंकट भोसले यांचे सह जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
उपस्थित होते.
शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना जिल्हाप्रमुख श्री.साळुंके म्हणाले की, पक्षश्रेष्ठींनी महायुतीच्या वतीने धाराशिव लोकसभा मतदारसंघात सौ.अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. महायुतीचा धर्म पाळून आपण त्यांच्या पाठीशी राहिले पाहिजे. सौ.अर्चनाताई पाटील यांचा विजय म्हणजेच महायुतीचा आणि शिवसेना पक्षाचा विजय आहे. म्हणून सर्व शिवसैनिकांनी मोठ्या ताकदीने कामाला लागावे, असे आवाहनही जिल्हाप्रमुख श्री.साळुंके यांनी केले.
0 Comments