धाराशिव/तेरणीचा छावा:-
धाराशिव जिल्ह्यातील मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी घेतली जरांगे पाटलांची भेट
मनोज जरंगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजी जालना जिल्ह्यातील अंतरगाव सराटी येथे मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील अनेक गावातील मराठा युवक आमरण उपोषणासाठी बसले होते तसेच काही ठिकाणी साखळी उपोषण चालू होते गाव ,तालुका व जिल्हा बंदची हाक दिल्यानंतर संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद पाळण्यात आला होता. जिल्ह्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको दुचाकी वाहन रॅली, चार चाकी वाहन रॅली, ट्रॅक्टर रॅली, बैलगाडी रॅली, जनावराच्या अंगावर मराठा आरक्षण जनजागृती लोगो, पेंटिंग करणे, बॅनर बाजी करणे अशा प्रकारची विविध प्रकारे मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ जिल्ह्यात करण्यात आले होते. जिल्ह्यात जरंगे पाटलांच्या समर्थनार्थ 4 सप्टेंबर रोजी पहिले आमरण उपोषण कळंब तालुक्यातील दहिफळ येथे सुरू झाले होते नंतर धाराशिव येथेही दोन मराठा युवकांनी अमरण उपोषणास सुरुवात केली त्यानंतर मोहा, येरमाळा, खेड, मेंढा ढोकी खामसवाडी, वाकरवाडी, काजळा ,दारफळ ,जागजी येथेही आमरण उपोषणास सुरुवात झाली तर येडशी ,कळंब, उपळा, तेर कारी मेडसिंगा सह अनेक ठिकाणी साखळी उपोषणास प्रारंभ करण्यात आला. अनेक ग्रामपंचायत कार्यालयाने मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय राजकीय पक्षांना प्रवेश बंदी व सर्व निवडणूकावर बहिष्कार घालण्याचाही ग्रामसभेत ठराव घेतला होता. त्यामुळे जिल्ह्यात मराठा आरक्षणाची दाहकता वाढत होती. जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसाचा अल्टिमेटम दिल्यानंतर सर्व अमरण उपोषणे व काही साखळी उपोषणे स्थगित करण्यात आली तर काही साखळी उपोषणे चालूच आहेत.
जिल्ह्यात मराठा आरक्षणाचे वातावरण तापत ठेवण्याचे काम उपोषण व आंदोलनकर्त्यांनी रविवार दि.24 सप्टेंबर रोजी जालना जिल्ह्यातील अंतरगाव सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन पुढील काळात आंदोलना दिशा कशी द्यायची याविषयी चर्चा केली, यावेळी मनोज जरांगे पाटील यांना जिल्ह्यात येण्याचे आमंत्रण दिले त्यावर लवकरच जिल्ह्याच्या दौरा करणार असून उपोषणकर्ते व आंदोलनकर्त्यांच्या भेटीला येणार असल्याचे सांगितले यावेळी सविस्तर चर्चा करू तसेच आंदोलनाची पुढील दिशा ठरण्यासाठी 14 ऑक्टोबर रोजी अंतरगाव सराटी येथे जास्तीत जास्त बांधवांनी येण्याचे ही आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी धाराशिव येडशी येरमाळा मोहा भानसगाव सोनेगाव, कौडगाव, भातंबरे, बेंबळी ,तेर ,नितळी, मेंढा खेड,कारी,मेडशिंगा येथील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
0 Comments