Subscribe Us

मनोज जरंगे पाटील 4 ,5 व 6 ऑक्टोबर रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर.


 कळंब, मंगरूळ, मोहा, दहिफळ, येरमाळा, येडशी ,धाराशिव, तुळजापूर, भूम या ठिकाणी भेटी देऊन मराठा समाजाशी संवाद साधणार
धाराशिव/तेरणीचा छावा:-
 मराठा आरक्षणासाठी 17 दिवस अमरण उपोषणाला बसलेले अंतरगाव सराटी येथील मनोज जरंगे पाटील यांनी बुधवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेत  धाराशिव जिल्हा दौरा जाहीर केला आहे.   बुधवार दि. 4 सप्टेंबर रोजी कळंब येथे आगमन त्यानंतर,मंगरूळ, मोहा, दहिफळ येरमाळा ,येडशी मार्गे मुक्कामी धाराशिव .गुरुवार दिनांक 5 ऑक्टोबर रोजी धाराशिव तुळजापूर मार्गे सोलापूरला जाणार आहेत. त्यानंतर 6 ऑक्टोबर रोजी बार्शी मार्गे भूम येथे जाणार आहेत त्यानंतर ते चौंडीकडे प्रयान  करतील या दौऱ्यात ते मराठा समाजाच्या भेटीगाठी घेणार असून समाजाच्या काय समस्या आहेत  हे ही जाणून घेणार आहेत पुढील आंदोलने शांततेत कशाप्रकारे करावीत  कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्यावी यासाठी समाजाला ते आवाहन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या दौऱ्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील मराठा बांधवां मोठ्या प्रमाणात तयारी करणार असल्याचे बोलली जात आहे

Post a Comment

0 Comments