मलकापूर येथील लोमटे महाराजांच्या मागे लागलेली शुक्लकाष्ट काही कमी होईना
येरमाळा /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील श्री दत्तमंदिर तीर्थक्षेत्र मलकापूर चे एकनाथ लोमटे महाराजानी ग्राम पंचायत कार्यालयाची बनावट कागदपत्र तसेच बनावट शिक्के वापरून विकास कामाचा प्रस्ताव करुन शासनाला एक कोटी दहा लाख निधीचा गंडा घ्यातल्याच्या प्रयत्न असल्याच्या प्रकरणात दि .९ रोजी पंचायत समितीने ग्रामसेवक,सरपंचावर गुन्हा दाखल केला व यामध्ये महीला सरपंचाला अटक झाली . या प्रकरणात पोलिसांनी एकनाथ लोमटे महाराजावर काल दि .२४रोजी गुन्हा नोंद करुन अटक केली आहे.
मलकापूर (ता.कळंब)येथील एकनाथ लोमटे महाराज यांनी जुन्याच झालेल्या कामावर नव्याने एक कोटी निधी आणल्याचे लक्षात आल्याने ग्रामपंचायतने हा निधी रद्द करण्याचा ठराव जिल्हा नियोजन समितीला पत्र देवुन निधी रद्द केला होता.
सदरील प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून गावातील सुंदर लोमटे यांनी येरमाळा पोलिसात तक्रार केली होती.चौकशीत पोलिसांनी तपास करुन अहवाल पंचायत समितीला सादर केला होता.सदर अहवालात ठरावातील सूचक,अनुमोदक,ग्राम सेवक,सरपंच यांच्या केलेल्या चौकशीत लोमटे महाराजांनी कागद पत्रांचा गैरवापर केल्याचे सांगूनही पंचायत समितीचे चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी टी.जे.जाधव यांच्या फिर्यादीवरून सरपंच,रुक्मिणी आगतराव घोळवे व ग्रामसेवक दीपक वेदपाठक यांच्यावर बनावट कागद पात्र,सही,शिक्के,बनावट ठराव तयार केल्या प्रकरणी पोलिसांत ( दि. ९) रोजी गुन्हा नोंद करण्यात आला होता.पंचायत समितीच्या चौकशी अहवालात सदरील प्रकार एकनाथ लोमटे महाराजांनी केल्याचे जबाब असूनही गटविकास अधिकारी यांनी लोमटे महाराजांना अभय देत असल्याचा आरोप होत होता .
महिला भाविकांच्या विनयभंग प्रकरणात २८ जुलै २०२२ रोजी गुन्हा दाखल झाला होता . आणि त्यानंतर महाराज जामीणावर सुटले होते नंतर कोर्टाच्या आदेशानुसार एकनाथ लोमटे महाराजावर बलात्काराच्या आरोपात ( दि.१५) रोजी अटक करून न्यायलयीन कोठडी मिळाली होती . न्यायालयीन कोठडीत असलेल्या लोमटे महाराजाला पुन्हा पोलिसांनी जिल्हा कारागृहातून ( दि.२४) रोजी बनावट कागदपत्र तयार करुन शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी पुन्हा एका गुन्ह्यात अटक करुन उस्मानाबाद न्यायालयात हजर केले आहे.
त्यामुळे मलकापूर येथील एकनाथ लोमटे महाराज यांच्यावर एका गुन्ह्यातून जेलवारी चालू असताना दुसऱ्या गुन्ह्यात पुन्हा अटक झाल्याने लोमटे महाराजांच्या मागील शुक्लकाष्ट काही थांबायचे नाव घेत नसल्याने दिसून येत आहे. भक्तावर आलेली सगळी संकट महाराजांनी स्वतः कडच घेतली की काय अशी चर्चा भक्तवर्गातून एकावयात येत आहे .
0 Comments