निवडी जाहीर करताना पहायला मिळाला मोठा गोंधळ
धाराशिव /तेरणेचा छावा:- येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीचा कार्यक्रम शनिवार दिनांक 26 ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी पार्टी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री बनसोडे यांच्या हस्ते निवडी केलेल्या पदाधिकाऱ्यांना निवड पत्र देऊन सन्मान करण्यात आला याप्रसंगी आ.विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील, सुरेश बिराजदार, गोकुळ शिंदे, आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये युवक जिल्हाध्यक्ष दिग्विजय शिंदे, धाराशिव तालुकाध्यक्षपदी प्रशांत फंड, शहराध्यक्षपदी सचिन तावडे, महिला तालुकाध्यक्षपदी अप्सरा पठाण, परंडा तालुकाध्यक्षपदी अमोल काळे, भूम तालुकाध्यक्षपदी रामराजे साळुंके, परंडा तालुका कार्याध्यक्षपदी विजयसिंह मोरे, बिभीषण खुणे, भूम तालुका कार्याध्यक्षपदी दादासाहेब दळवे, परंडा तालुका उपाध्यक्षपदी दादासाहेब बारस्कर, अतुल गोफणे, धाराशिव-कळंब विधानसभा अध्यक्षपदी मोहन मुंडे, धाराशिव महिला तालुकाध्यक्षपदी अप्सरा पठाण, सामाजिक न्याय विभागाच्या जिल्हाध्यक्षपदी अतुल जगताप, सोशल मीडिया जिल्हाध्यक्षपदी सुहासराव मेटे, माजी जिल्हा सैनिक सेलच्या जिल्हाध्यक्षपदी मच्छिंद्र क्षिरसागर, जिल्हा उपाध्यक्षपदी नानासाहेब पवार, सहसचिवपदी राजाभाऊ जानराव, तुळजापूर तालुकाध्यक्षपदी विनोद जाधव, धाराशिव शहराध्यक्षपदी विक्रम कांबळे, डाळींब युवक गट प्रमुखपदी मोतीलाल चव्हाण, वाशी ओबीसी सेल तालुकाध्यक्षपदी चिदंबर अवधूत, वाशी तालुका उपाध्यक्षपदी विनोद माने, भूम- परंडा- वाशी विधानसभा उपाध्यक्षपदी सुरेश भांडवले यांची निवड करण्यात आली आहे. तर यावेळी कळंब तालुका अध्यक्ष पदासाठीही निवड होणार होती परंतु आपल्या स्वतःच्या नातेवाईकाला त्या ठिकाणी वर्णी लागावी यासाठी एक आमदार साहेब प्रयत्न करत असल्याची कुजबुज कार्यकर्त्यातून एकावयास येत होती. परंतु त्या ठिकाणी राष्ट्रवादीतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची तेथे अडचण निर्माण होत होती.त्यामुळे ही निवड होऊ शकली नसल्याचा कार्यकर्त्यातून बोलले जात आहे! यापुढील काळात तरी निष्ठावंत कार्यकर्त्याची निवड होणार की नातेवाईकाची होणार हे पाहणे गरजेचे आहे.
0 Comments