Subscribe Us

तांबरी विभागात सतत विद्युत प्रवाह खंडित होण्याच्या प्रमाणात वाढ


धाराशिव / तेरणेचा छावा:- शहरातील तांबरी विभागात सतत विद्युत प्रवाहित खंडित होत असल्यामुळे नागरिकांना प्रचंड मोठ्या त्रासाला समोर जावे लागत आहे. त्यामुळे हे प्रकार तात्काळ थांबवावे, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी विद्युत वितरण कंपनीच्या उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्याकडे एका निवेदनाद्वारे  गुरुवार दि.१३ जुलै रोजी केली आहे.
 दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, धाराशिव शहरातील तांबरी विभागातील वीज पुरवठा सातत्याने कमी दाबाने मिळत आहे. तसेच नेहमी खंडित होत असल्यामुळे याचा परिणाम घरातील विद्युत उपकरणांवर होत असून अनेक उपकरणे नादुरुस्त होत आहेत. तर काही जळून देखील गेली व जात आहेत. मागील १५ दिवसापासून अनेक वेळा सातत्याने विद्युत प्रवाह खंडित होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याबाबत वारंवार तक्रार करून देखील संबंधित कार्यालयाकडून अद्यापपर्यंत यावर कुठल्याही प्रकारची ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे या समस्यचे लवकरात लवकर निराकरण करण्यात यावे. अन्यथा नागरिकांच्या रोषास विद्युत वितरण कंपनीला सामोरे जावे लागेल, असा इशारा या भागातील नागरिकांनी दिला आहे. यावर  संकेत सुर्यवंशी, दत्तात्रय माळी, मुकुंद घाटगे, अनिरुद्ध जोशी, अनुप गरड, सुरेश भोसले, सुरेश माने आदींसह इतर नागरिकांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments