Subscribe Us

अंगणवाडीतील लहान मुलांच्या जीवनाशी प्रशासनानं लावलाय खेळ!

  धाराशिव/तेरणेचा छावा:-
धाराशिव महिला व बालविकास विभाग आयुक्तालय , एकात्मिक बालविकास सेवा योजना यातून अंगणवाडीत शिकणाऱ्या लहान मुलांना शासनामार्फत महिला बचत गटाद्वारे विद्यार्थ्यांना सुकळीचे पुढे देण्यात येतात मात्र यामध्ये लहान मुलांच्या जीवनाशी खेळ करताना चे चित्र सध्या दिसत आहेत‌‌. सुकळीचे पुढे कधी तयार केले याची त्यावर तारीखच नाही व सुकडीच्या पुडयामध्ये किडे निघाल्याचे समोर आले आहे. 
    धाराशिव शहरातील वैराग नाका येथे अंगणवाडी क्र.३७ मध्ये विद्यार्थ्यांना सुकळीचे पुढे 11 जुलै रोजी वाटप करण्यात आले दोन महिन्याचे पुढे एकदाच वाटप करण्यात आले. या सुकडीच्या पुढयामध्ये अनेक जणांच्या घरी पुढे फोडल्यानंतर त्यामध्ये किडे निघाल्ये आहेत आहे. जिल्हा परिषद प्रशासनाकडे शहरातील अनेक नागरिकांनी याबाबत या अगोदरही तक्रार केली होती व किडे आळ्या बुरशी निघाल्याचे व्हिडिओ देखील सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले अजूनही पाहायला मिळत आहेत मात्र प्रशासन याकडे डोळे झाकणात करत आहे. ही डोळेझाक कशासाठी करत आहे यात काही अधिकार्‍याचे तर देवाण-घेवाण नाही ना असा प्रश्न नागरिकांना पडला आहे? 
   याबाबत अंगणवाडीच्या शिक्षकां कडे याची तक्रार केली असता त्यांनी अशी माहिती दिली की प्रशासनाला अनेक वेळा तक्रारी करून देखील प्रशासन याकडे लक्ष देत नाही आम्ही काय करणार असा थेट सवाल अंगणवाडी चालकांनी उपस्थित केला आहे. अशाप्रकारे लहान मुलाच्या जीवनाशी खेळ खेळणाऱ्या कारवाई होणार की नेहमीप्रमाणे नुसतीच कारवाई केल्याचा दिखावा होणार हे आता लवकरच समजणार आहे. 

Post a Comment

0 Comments