धाराशिव/ तेरणेचा छावा:-
धाराशिव येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या समोरच्या ऑक्सिजन प्लांटमधील शेडमध्ये एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार( दि. 10 जून )रोजी प्रेताची दुर्गंधी सुटल्यावर उघडकीस आली आहे .
मृतदेहाची दुर्गंधी सुटलेली असल्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्यामुळे ती घटना समजली परंतु जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या समोरील दर्शनी ऑक्सिजन प्लांट शेडमध्ये हा मृतदेह तेथील प्रशासनाला कसा दिसला नाही , असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे
त्यामुळे जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयातील प्रशासनाची यंत्रणा किती सतर्क आहे हे दिसून येत आहे..
0 Comments