धाराशिव /तेरणेचा छावा:-
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी शेखर शांतीनाथ घोडके यांच्या निवडीचे पत्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या हस्ते गुरुवार (दि.22 जून) रोजी देण्यात आले.
अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातुन स्वकर्तुत्वाने पुढे आलेल्या कोणताही राजकीय वारसा नसलेल्या सर्वसामान्य कुटुंबातून सामान्य युवकाच्या निवडीचे जिल्हाभरातील कार्यकर्त्यांमधून स्वागत केले जात आहे.
श्री. घोडके यांनी धाराशिव जिल्ह्यात क्रीडा , सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांची मोट बांधलेली आहे
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून पुढील काळात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार यांच्या विचारांनुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पक्ष संघटन मजबूत करावे अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात प्रदेशाध्यक्ष शेख यांनी व्यक्त केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव रोहित बागल, तुळजापूर तालुकाध्यक्ष धैर्यशील पाटील, रणवीर इंगळे यांच्यासह धाराशिव येथील राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरदचंद्रजी पवार, माजी उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, खासदार सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, धाराशिव जिल्हाध्यक्ष सुरेशजी बिराजदार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन वाढविणार असल्याचे तसेच जिल्हाभरात युवकांचे संघटन करण्यावर भर देऊन ‘बुथ तिथे राष्ट्रवादी युथ’ ही संकल्पना राबवणार असून . पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली तरी ती आपण यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सदैव तयार असल्याचेही नूतन जिल्हाध्यक्ष घोडके यावेळी म्हणाले.
0 Comments