पाणीपुरवठा सुरळीत करावा, गावातील कचरा व्यवस्थापन करावे,नाल्या साफ करण्याची मागणी.
दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील गौर गावातील ग्रामस्थांनी विविध मागण्यासाठी शनिवार दि २४ जुन रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या समोर लाक्षणिक आंदोलन केले.
गावातील कचरा व्यवस्थापन करावे, गावातील नाल्या साफ कराव्या, गावातील पाणीपुरवठा सुरळीत करावा.या मागण्यासाठी लाक्षणिक आंदोलन छेडण्यात आले होते.सारिका मारुती देशमुख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
.यावेळी गावातील नारायण पाटील, नवाकाका देशमुख, बापू असकुळे, तात्या आसकुळे, जनाबाप्पा लंगडे, अनिल पवार, नामदेव केसरी, उत्तरेश्वर अवधूत महादेव कोळी, आसिफ पटेल विश्वजीत देशमुख, शैलेश देशमुख ,दीपक माळी सूर्यकांत देशमुख,माधव देशमुख,दिलीप माळी,विनोद कोरडे, बापू जाधव, सुशील लंगडे, भारत भाऊ माळी अण्णासाहेब माळी, दिनेश पाटील, अमर शिंदे,शंकर मचाले भगवान केसरे,अदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.जवळ जवळ हे आंदोलन सकाळी ९ ते साडे अकरा वाजेपर्यंत आंदोलन सुरू होते.
ग्रामपंचायत कार्यालयाच्या वतीने सरपंच सुषमा देशमुख यांनी आंदोलन करताना प्रति पत्र देण्यासाठी आल्या होत्या परंतु आंदोलनकर्त्यांनी ते पत्र स्वीकारले नाही त्यामुळे.
काही काळ तानतनावात निर्माण झाला होता..आंदोलन कर्ते मागणीवर ठाम होते.जर मागणी मान्य नाही केली तर पुढील आंदोलन बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा दिला आहे.ग्रामसेवक जावळे यांच्याकडे मागणीचे निवेदन दिले आहे.
लोकसंख्येच्या मानाने पाणीपुरवठा कमी होत आहे.आमची मागणी वाढीव अधिग्रहण करण्याची आहे.तसेच सार्वजनिक मुतारी करावी अशी मागणी केली आहे.१५ वित्त आयोगातून मुतारीला मंजुरी देऊन ही का बांधली नाही असा आमचा प्रश्न आहे.आजच्या आंदोलनात आम्ही विविध मागण्या केल्या आहेत त्यावर ग्रामपंचायतने अंमलबजावणी करावी.
-श्याम देशमुख शिवसेना नेते.
0 Comments