Subscribe Us

धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा


कळंब/तेरणेचा छावा:-धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२० जून रोजी  वेद शैक्षणिक संकुलाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये वृक्षारोपण,रक्तदान शिबिर, ग्रामीण रुग्णालय,कळंब येथे फळ वाटप  निराधार व एका निराधार मुलीस आर्थिक मदत या उपक्रमांनी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टेकाळे,राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभाग जिल्हाध्यक्ष प्रा.सुशील शेळके,गणपतराव कथले युवक आघाडीचे सुमित बलदोटा,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब कथले,शिवसेनेचे हर्षद अंबुरे,युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख सागर बाराते,राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा.तुषार वाघमारे,व्हॉइस ऑफ मीडियाचे अमर चोंदे, सामाजिक कार्यकर्ते अशोक जगताप, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भीमा हगारे,बालाजी भातलवंडे,गणेश सदाफूले,श्रीकांत टेकाळे,विनायक टेकाळे,भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने,सुरज भांडे  यांच्यासह सर्व कर्मचारी उपस्थित होते.
     यावेळी मान्यवरांच्या हस्ते वेद शैक्षणिक संकुल परिसरात 53 नारळ वृक्ष लागवड करण्यात आली व ही वृक्ष विद्यार्थ्यांना संगोपनासाठी दत्तक देण्यात आली. तसेच वाढदिवसाचे औचित्य साधून सह्याद्री ब्लड बँक यांच्या सहकार्याने वेद शैक्षणिक संकुलामध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले.यामध्ये 53 बहाद्दर कार्यकर्ते,सहकारी,विद्यार्थी व कर्मचारी यांनी रक्तदान केले.
      त्यासोबतच ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी रुग्णांना राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे तालुकाध्यक्ष किरण मस्के यांच्या हस्ते फळ वाटपही करण्यात आले.संत ज्ञानेश्वर निराधार बालकाश्रम या ठिकाणी  दहावीत चांगले गुण मिळवलेली वैष्णवी हराळे हिच्या पुढील शिक्षणासाठी संस्थेच्या वतीने आर्थिक मदत ह.भ.प महादेव महाराज अडसूळ यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. ही मदत प्रा.तुषार वाघमारे व राष्ट्रवादीच्या सौ.सलमा सौदागर यांच्या हस्ते वैष्णवीला देण्यात आली.
         हे सर्व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 
प्रा.श्रीकांत पवार,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके, प्रा.मोहिनी शिंदे ,भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सूरज भांडे, निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक सागर पालके,निदेशक विनोद जाधव,आदित्य गायकवाड,विनोद कसबे यांच्यासह विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments