Subscribe Us

सुरेश कांबळे यांच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल.


 धाराशिव तेरणेचा छावा:-
  भूम येथील फैयाज पठाण या युवकाच्या आत्महत्या प्रकरणी भूम येथील जय हनुमान ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांच्यासह 6 जण व अनोळखी दोन-तीन जनावर भूम येथील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
    आत्महत्या करण्यापूर्वी फैयाज पठाण याने आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग करून डॉ,.नंदकुमार स्वामी, अर्चना स्वामी, यश स्वामी, सुरेश भाऊ कांबळे, यांच्यासह इतर पाच ते सहा लोकांना अटक केल्याशिवाय माझा मृतदेह ताब्यात घेऊ नये माझ्या मृतदेहाला मुंग्या लागल्या तरी चालतील असे त्या व्हिडिओत सांगितले होते तसेच पोलीस स्टेशनच्या समोर येऊनही धमकी देत आमचे पोलीस काहीही करू शकत नाहीत अशी धमकी देऊन तेथून निघून गेले होतेत सेच मारहाण 20 जून रोजी झाल्याचेही त्यात सांगण्यात आले आहे अशा प्रकारची व्हिडिओ क्लिप आत्महत्या केलेल्या    फैय्याज पठाण च्या मोबाईल मध्ये सापडली आहे.
    भूम येथील फैयाज शेख या युवकाने आपल्या राहत्या घरी 21 जून रोजी पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर लगेच त्यांनी भूम पोलीस स्टेशन मध्ये मृतदेह हलवत आरोपीवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. पोलीस स्टेशन समोर मोठा जमाव जमला होता तणावाची परिस्थिती पाहून  पोलिसांनी कुटुंबीयांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार सुरेश कांबळे सह 6 जनावर  व अनोळखी दोन-तीन व्यक्तीवर कलम 306,323 ,504 ,506 ,34 यान्वये भूम पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments