मते परिवारातील पाचवी अधीकारी.गावातील पहिली मुलगी एम पी एस सी पास.
परिवाराकडून केला सत्कार.
दहिफळ /तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील रहिवासी बापुराव बाबासाहेब मते यांची कन्या कु सोनल मते हिने एम पी एस सी परिक्षेत घवघवीत यश मिळविले असुन पहिल्याच प्रयत्नात वयाच्या २३ व्या वर्षी तिने यश संपादन केले आहे.मते परिवारातील ही पाचवी अधिकारी बनली आहे.सार्वजनिक बांधकाम विभाग सहाय्यक अभियंता म्हणून तिची निवड झाली आहे.मुलीच्या यशाबद्दल परिवारात आनंदाचे वातावरण आहे.तिचा सत्कार करण्यात आला.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,दहिफळ येथील स्व हभप बाबासाहेब मते महाराज हे भागवत संप्रदायाचे प्रसारक होते.वारकरी संप्रदायात त्यांचे योगदान होते.विशेष बाब म्हणजे त्यांची दोन मुले , दोन सुना क्लास वन अधिकारी आहेत.घरात शैक्षणिक वातावरण चांगले आहे.आपली मुले कशी घडवावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे हे मते परिवार होय.
सध्या मुलगी नको मुलगाच हवा ही मानसिकता असताना मुलांपेक्षा मुली विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत आहेत.स्पर्धा परिक्षेत मुलींची संख्या वाढत आहे.
दहिफळ सारख्या खेडेगावात म्हणावी अशी शिक्षण व्यवस्था नाही.वातावरण नाही.बरेच पालक शहराच्या ठिकाणी मुलांना शिक्षणासाठी पाठवत आहेत.येथील बापुराव मते नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात खाजगी कंपनीत काम करत होते.त्यांच्या दोन्ही मुलांचे प्राथमिक शिक्षण बाहेर गावी झाले.पहिली ते चौथी अकोला जिल्ह्यातील व्याळा गावात झाले.तर पाचवी ते दहावी शिक्षण दिंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील मराठा विद्या प्रसारक संस्था के आर टी हायस्कूल येथे मुलीचे शिक्षण झाले.
आपली मुलगी हुशार आहे ती पुढचं शिक्षण चांगले घेऊ शकते.म्हणून नेरुळ आय आय टी स्पेस हायस्कूल येथे पाठवले शिक्षण मोफत होते.आकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर सोनल मते हिने सरदार वल्लभभाई पटेल इंजिनिअरिंग कॉलेज अंधेरी मुंबई येथे प्रवेश घेऊन पदवी प्राप्त केली व एन आय टी मधून इलेक्ट्रीकल इंजिनिअर पदवी मिळवली . एवढ्यावरच न थांबता तिने ठरवले की यु पी एस सी,एम पी एस सी परिक्षा द्यायची.व अभ्यास सुरू केला.यु पी एस सी परिक्षा दिली मात्र थोडक्यात संधी हुकली.निराश न होता.थेट एम पी एस सी परिक्षा दिली.पहिल्याच प्रयत्नात तिने यश संपादन केले.
आई गृहिणी आहे तर वडील शेतकरी आहेत.पशु आहाराचे दुकान चालवत आहेत.
वडीलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सोनलने मेहनत घेतली.चुलते संदिपान मते,(सहकार विभाग)माधव मते (शिक्षणाधिकारी)चुलती शकुंतला मते (आदिवासी विभाग) सुनिता मते(समाजकल्याण अधिकार )
यांच्या मार्गदर्शनाखाली सोनलने अभ्यास केला.व नुकत्याच पार पडलेल्या परिक्षेत पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र राज्यातून ४४ रॅंक मधून यश संपादन केले आहे.
एम पी एस सी परिक्षेत यश मिळाले असताना ही तिचे मोठे स्वप्न आहे.राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा देऊन वर्ग एक अधिकारी बनायचं आहे.
दहिफळ येथील ती पहिलीच एम पी एस सी परिक्षा दिलेली मुलगी आहे.मते परिवारातील ती पाचवी अधिकारी बनली आहे.तिचा सत्कार दि ११/६/२०२३ रोजी मते परिवाराच्या वतीने करण्यात आला.यावेळी नारायण मते, विष्णू मते, सदाशिव मते, अच्युत महाराज मते,संदिपान मते, पद्माकर पाटील, रामेश्वर मते, बापुराव मते, दिलीप अंगरखे,कांतीलाल मते,केशव मते, नरेंद्र मते, विश्वजित मते, उपस्थित होते.
.
स्पर्धेचे युग आहे.त्या स्पर्धेत टिकायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नाही.मेहनत केली की यश नक्कीच मिळते.आई वडीलांचे स्वप्न पूर्ण झाले आहे.परंतू मला पुढचा पल्ला गाठायचा आहे.राज्य लोकसेवा आयोग स्पर्धा परिक्षा द्यायची आहे.वर्ग एक अधिकारी बनायचं स्वप्न आहे.त्याही परिक्षेची पूर्वतयारी मी करत आहे.
-कु सोनल मते.
0 Comments