Subscribe Us

उमेश बारकुल यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित


 
 धाराशिव/तेरणेचा छावा:-
 येरमाळा येथील उमेश बारकुल यांना सन 2022 -23 चा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सोमवार (दि.30 मे) रोजी  धाराशिव येथील  जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात  मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
     येरमाळा येथील रहिवासी असलेले उमेश बारकुल यांनी बाभंळगाव ग्रामपंचायत कार्यालयात पारदर्शक कारभार तसेच शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत 100% पोचविण्यात यशस्वी झाल्याबद्दल सन 2022 -23 चा  आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता उपमुख्य कार्यकारी अधिकारी विलास जाधव व इतर मान्यवरांच्या हस्ते सोमवार दिनांक 30 मे रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहात  प्रदान करण्यात आला, यावेळी जिल्हा परिषदेचे सर्व खात्याचे  जिल्हाभरातून आलेले कर्मचारी हितचिंतक यांची यावेळेस मोठी गर्दी केली होती. उमेश बारकुल यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार मिळाल्याबद्दल सहकारी कर्मचारी, हितचिंतक ,मित्र परिवारातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment

0 Comments