Subscribe Us

येरमाळा बसस्थानकासाठी वाढीव निधी मंजूर करून सुसज्ज बसस्थानक करण्याची भाविकांची मागणी

येरमाळा/तेरणेचा छावा:- येथील नवीन बस स्थानकासाठी १ कोटी निधी मंजुर झाला आहे.परिवहन विभागाला जिल्ह्यात सर्वात जास्त उत्पन्न देणारे बस्थानक म्हणून येरमाळा बस स्थानकाची ओळख आहे.श्री येडेश्वरी देवस्थानला लवकरच अ दर्जा मिळणार असून राज्यातील बस्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक बसफेऱ्या असणारे बस स्थानक आहे.परिवहन विभागाने मात्र येरमाळा बसस्थानकाला केवळ १ कोटीचा निधी मंजूर झाल्या नंतर येथील बसस्थानक सुसज्ज व्हावे या साठी निधी वाढवून मिळावी अशी मागणी होती.मात्र बस स्थानकाच्या कामाचा श्रीगणेशा झाला असून जुने बस स्थानक पाडून कामाला सुरुवात झाली.नवीन बसस्थानक जुन्या सारखेच होणार असल्याने ग्रामस्थ,भाविक,प्रवाशांच्या आशेवर विरझन पडले आहे 
       तुळजाभवानीचे दर्शन घेऊन येडेश्वरी दर्शनाशिवाय तुळजाभवानी ची वारी अपुर्ण मानली जाते,तुळजाभवानीला येणारा प्रत्येक भाविक येडेश्वरी देवीच्या दर्शनाला येतोच.त्या तुलनेत या बसस्थानकाला निधी मिळाला होता,येडेश्वरी देवीची चैत्र पोर्णिमा यात्रेचे परिवहन विभागाला मिळणारे उत्पन्न इतर यात्रेच्या तुलनेत अधिक आहे.
येरमाळा बसस्थानक हे राज्याचे केंद्रबिंदू असणारे बसस्थानक असुन येथून पश्चिम,दक्षिण,महाराष्ट्र खानदेश,विदर्भ अशा राज्यातील चारी दिशेला जाणाऱ्या बसेसच्या दररोज ५८० फेऱ्या असणारे  बसस्थानक आहे.शिवाय परिवहन विभागाच्या दफ्तरी जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारे बसस्थानक म्हणुन या बसस्थानकाची नोंद आहे.येथे राज्यभरात वितरित होणाऱ्या खव्याची मोठी बाजारपेठ आहे येथुन राज्यासह बाहेर राज्यात बसने खवा वितरित केला जातो,त्याचे पासेसचे दरमहा ३ लाख तर विद्यार्थी पासचे दरमहा २ लाख असे दरमहा ५ लाख उत्पन्न या बसस्थानकाचे आहे.

येरमाळा बसस्थानकाला दोन एकर जमीन असुन या ठिकाणी हे बसस्थानक जिल्हा,तालुका स्तरावरील बसस्थानका प्रमाणे नसले तरी पुणे जिल्ह्यातील इंदापूर, पंढरपूर बसस्थानकाप्रमाणे हे बसस्थानकही परिवहन विभागाने बीओटी तत्वावर बांधुन या बसस्थानकात परिसरातील विविध व्यवसायिकांसाठी शॉपिंग कॉम्प्लेक्स उपलब्ध करुन द्यावे अशी बऱ्याच दिवसांनापासून मागणी होती.असे झाले तर नवीन व्यापरपेठ नावारुपाला येऊन गावच्या विकासासह परिवहन विभागाला बस स्थानकाचे सध्या मिळणारे उत्पन्न व भविष्यात मिळणारे कायम उत्पन्न यामुळे जिल्ह्याच्या परिवहन विभागाला फायदेशीर ठरेल या सर्वच बाबीवर विरझन पडले असुन जुन्या बसस्थानका प्रमाणे नवीन बस स्थानकाच्या कामाला सुरुवात झाली आहे.
एक कॅन्टीन,नियंत्रण कक्ष,प्रतीक्षा कक्ष,तीन प्लेट फॉर्म ते ही अपुरे या पद्धतीने होणार असल्याने नवीन बसस्थानक होऊनही प्रवाशांची गैर सोय होणार आहे.गेल्या वर्षी निधी मंजूर झाल्या नंतर निधी वाढवून मिळावा चांगले बसस्थानक व्हावे या साठी मागणी असूनही ग्रामपंचायत,देवस्थान ट्रस्ट,गाव पुढाऱ्यांनी प्रयत्न केले नाहीत.या बाबत वारंवार बातम्या प्रकाशित केल्या त्यावेळी जिल्हा विभाग प्रमुख चेतना खीलवाडकर यांनी शिस्ट मंडळाने भेटून चर्चा केली तर प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले होते मात्र ट्रस्ट अथवा ग्रामपंचायतने प्रयत्न केले नाहीत.
...येरमाळा बस बसस्थानक हे राज्याचे मध्यवर्ती बसस्थानक असून या ठिकाणी कर्मचारी,अधिकारी यांच्यासाठी विश्रामगृहाची आवश्यकता आहे.मुक्कामी गाडीच्या कर्मचारी गाडीतच झोपतात.नियोजित कामाच्या तीन प्लॅटफॉर्म वर ६० प्रवाशी बसण्याची सोय होईल,पावसाळा,थंडीच्या दिवसात प्रवाशांची गैरसोय होणार प्लॅटफॉर्म वाढले तर प्रवाशांची सोय होईल.
चौकट...मंजूर झालेला निधी राज्य शासनाचा असून परिवहन विभाग यात वैयक्तिक निधी खर्चू शकत नाही.राज्यात प्रसिद्ध देवस्थान म्हणून ओळख असलेल्या येरमाळा बसस्थानकाला खासदार,यांच्यासह पदवीधर,शिक्षक,स्थानिक स्वराज्य संस्था,जिल्ह्यातील चार आमदारांनी स्थानिक निधीतून या ठिकाणी निधी दिला तर हे बसस्थानक सुसज्ज प्रवाशांच्या सोईचे होईल

Post a Comment

0 Comments