उमेदवारीसाठी अनेकांच्या कोलांटउड्या!
कळंब/तेरणेचा छावा:-
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा- शिवसेना युती अशी दुरंगी लढत होत आहे. दोन्ही पॅनेलकडून मैदानात बलाढ्य उमेदवार उतराविले असल्याचे पहावयास मिळत आहे . त्यामुळे ही निवडणूक पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास घाडगे-पाटील, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रतिष्ठेची होणार आहे.
महाविकास आघाडी, भाजपा- शिवसेना उमेदवारांना अर्ज माघार घेण्यासाठी वरीष्ठ नेत्यांनी मध्यस्थी केल्याचे सांगितले जाते. अनेकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत तिकीट, महामंडळ, तसेच पक्ष संघटनेत मोठी जबाबदारी देण्याचा शब्द दिल्याचे कार्यकर्त्यातून बोलले जात होते.
महाविकास आघाडीकडून विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून शिवाजी कापसे, हनुमंत आवाड, मधुकर भुसारे, श्रीधर भवर, संदीप मडके, कल्याण टेकाळे, बाळासाहेब सरवदे, महिला मतदार संघातून सुनिता प्रभाकर शेळके, सुजाता तुषार वाघमारे, ओबीसी मधून हरिभाऊ कुंभार, एनटीतून भारत सांगळे, ग्रामपंचायत मतदारसंघातून बोरगावचे सरपंच अजय समुद्रे - पाटील, प्रणित डिकले, बालाजी आल्टे, रामहरी मुंडे, व्यापारीमधून लक्ष्मण कोल्हे, रोहन पारेख, हमाल मापाडीतून पंडित हौसलमल यांना उमेदवारी देण्यात आल्या आहेत.
कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 जागा असून 36 उमेदवार रिंगणात आहेत
भाजप-शिवसेना युतीच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मतदार संघातून विकास बारकुल, पंडीतराव टेकाळे, लक्ष्मण देशमुख, बजरंग शिंदे, किरण पाटील, प्रभाकर लंगडे, विलास पाटील, महिला मतदार संघातून उषाताई उत्तम टेकाळे, सुमनबाई अर्जून कानाडे, ओबीसी मधून त्रिंबक कचरे, एनटीतून बोंदर माणीक, ग्रामपंचायत मतदारसंघातून अनंत लंगडे, अशोक टेळे, अरूण चौधरी, रामकिशन कोकाटे, व्यापारी व मापाडी मतदारसंघातून कांतीलाल बागरेचा, अजीत करंजकर, हमाल मतदारसंघातून धनंजय आडसुळ यांचे उमेदवारी अर्ज अंतिम ठेवण्यात आले आहेत. अनेकांनी तिकिटासाठी कोलांट उड्या मारल्याचे चित्र दिसून येत आहे. आज तरी दोन्ही पॅनल मधील उमेदवार यांच्यात तगडी फाईट होणार असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
0 Comments