Subscribe Us

उस्मानाबाद जिल्ह्याचे धाराशिव नामांतरण विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण


धाराशिव/तेरणेचा छावा:-
 उस्मानाबाद जिल्हा ऐतिहासिक जिल्हा असुन या जिल्ह्याचे नाव धाराशिव ठेवण्यासाठी हालचाली सुरु असुन नुकतेच केंद्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर व उस्मानाबादचे धाराशिव नामांतराबाबत मंजुरी दिली, गरज राहिल वास्तवतेची या नामांतराबाबत नागरिकांना विश्वासात घेणे गरजेचे होते, त्यांच्या हरकती, मते जाणुन घ्यायला पाहिजे होते परंतु असे न करता आम्हा नागरीकांना विश्वासात न घेता व न्यायालयीन प्रकरण चालु असतांना केवळ सत्ता हाती असल्याने या नामांतरास मंजुरी दिल्यानंतर नागरीकांच्या हरकती मागविण्यात आले आहेत. या नामांतराच्या मंजुरीस नागरिक म्हणुन आम्ही आमच्या  वतीने विरोध दर्शवित आहोत. मा. साहेबांना विनंती की, उस्मानाबादच्या नामांतरास आमचा विरोध असुन नामांतर करण्यात येवु नये याकरिता आम्ही आमरण उपोषणाला दि. 08-03-2023. रोजी आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बसुन न्याय मागणार आहोत. या उपोषणास अनेक जणांचा सहभाग पाठिंबा राहणार आहे. याबाबत आपण वरीष्ठांना कळवुन आमच्या मागणीचा विचार करुन सहकार्य करावे हि विनंती असे  जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
     याची प्रत १. मा. सरन्यायाधिश सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली ,.राष्ट्रपती मॅडम. भारत सरकार, नवी दिल्ली., प्रधानमंत्री भारत सरकार नवी दिल्ली., राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुंबई.त्यांना निवेदनाद्वारे तीन मार्च रोजी देण्यात आली आहे. 
    अजहर चाँद मुजवार , शेख जमीर मैनुद्दीन हे दोघे आमरण उपोषण करणार असल्याची पत्रात नमूद केले आहे

Post a Comment

0 Comments