येरमाळा/ तेरणेचा छावा:-
: बावी, ता. वाशी येथे मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी दुपारी शेतामध्ये असलेल्या घरी एक अनोळखी इसमाने भंगार विकत घेण्याचा बहाणा करुन शेतातील घराचे बाजूला झाडाखाली बसलेल्या वयोवृध्द महिला सुभद्राबाई बळीराम शिंदे हिस गळ्यातील सोन्याची पोत गाठवून देतो असे म्हणून बतावणी केली. वयोवृध्द महिलेने नकार दिला असता अनोळखी भंगारवाल्याने जबरीने गळ्यातील सोन्याची पोत चोरुन घेऊन मोटरसायकलवर पळुन गेला होता.यावरुन पोलीस ठाणे येरमाळा येथे गुन्हा रजि. नं. 40/2023 कलम 392 भा.द. सं. प्रमाणे दाखल आहे.
गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. दिनकर गोरे, पोलीस उप निरीक्षक आनंदराव वाठोरे यांचे एक पथक तयार करुन मिळालेल्या माहितीवरुन केज, जि. बीड येथुन इसम नामे जलाल सिराज शेख वय 60 वर्षे यास दि. 03.03.2023 रोजी ताब्यात घेऊन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला 24 सोन्याचे मणी व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल क्र एमएच 44 ई 9792 नमूद मुद्देमाल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे.
सदरची कामगीरी पोलीस ठाणे येरमाळा चे प्रभारी सपोनि- श्री. दिनकर गोरे, पोलीस उप निरीक्षक आनंदराव वाठोरे,विश्वनाथ मुंढे, पोलीस हावलदार- कपील बोरकर, पोलीस अमंलदार- सुर्याजीत कदम यांनी केली आहे.
0 Comments