धाराशिव / तेरणेचा छावा: - राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी नगर परिषदेच्या सफाई महीला कामगारांना साड्यांचे वाटप केले. तर सावंत यांना उदंड आयुष्य लाभावे यासाठी धारासुरमर्दिनी देवी मंदिरात नवग्रह हवन पूजन करुन साकडे घातले.
धाराशिव नगर परिषदेच्या प्रांगणात महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके, महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारतीताई गायकवाड, वर्षाताई परदेशी, सोनालीताई शिंदे, पप्पू मुंडे, भीमाआण्णा जाधव, जयंतराजे भोसले, शशांक सस्ते, पिंटू पवार, दादा घोरपडे, कुणाल धोत्रेकर, रजनीकांत माळाळे, रणजीत चौधरी, अजिंक्य आगलावे, दिनेश तुपे, सचिन मडके, अक्षय माळी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments