येरमाळा/ तेरणेचा छावा:- तर पुजारी,मानकऱ्यांना आम्ही आमराई मंदिरात येऊ देणार नाही असा धमकी वजा इशारा मंगळवार (दि.14 मार्च )रोजी झालेल्या प्रशासकीय यात्रा नियोजन बैठकीत संतप्त उपसरपंच गणेश बारकुल यांनी येडेश्वरी मंदिर परिसरात सुरु असलेल्या खाजगी पार्किंग वसुली धारकांना दिला.मंदिर परिसरात खाजगी पार्किंग,आमराई यात्रा परिसरात दुकानदारांकडून होणारी लूट आणि आमराई परिसरात गावठी दारु विक्री हे विषय वगळता प्रशासकीय यात्रा नियोजनावर बैठक शांततेत पार पडली.
येथील श्री येडेश्र्वरी देवीच्या येणाऱ्या चैत्र पौर्णिमा यात्रा नियोजन बैठक आज ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली बैठकीचे प्रस्ताविक करताना उपसरपंच गणेश बारकुल यांनी सांगितले की श्री येडेश्र्वरी देवी तुळजभवानीची धाकटी बहीण म्हणून राज्यासह,बाहेर राज्यात प्रसिद्ध आहे.मात्र कांही लोकांनी येडेश्र्वरी
मंदिर परिसरात बेकायदेशीर खाजगी जागेत पार्किंग वसुली सुरु केली आहे.यामुळे संतप्त होऊन या प्रकारामुळे श्री येडेश्र्वरी प्रसिध्द देवस्थान व गावाची बदनामी होत असल्याची सबब देत यप्रकारची दखल घेत त्यांनी ग्रामपंचायतने मंदिर परिसरात लिलाव पद्धतीने पार्किंग ठेका देणार असल्याचा ठराव गेल्या मासिक बैठकीत घेतल्याचे व लवकरच बाबत लिलाव प्रक्रिया केली जाणार आसल्याचे सांगुन. आमराई परिसरात कांही जागा मालक बाहेर गावाहून आलेल्या रहाट पाळणे वाल्यांसह अनेक व्यावसायिकांनकडून पैसे घेवून त्यांची लूट करतात.त्या बाबत त्यांच्या लेखी तक्रारी आहेत त्यामुळेच गावातील शेतककऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याची दवंडी देण्यात आली होती मालकीची जागा आहे म्हणून कांही लोक असे वागत असतील तर देवीचे आमराई पालखी मंदिरही आमच्या जागेत आहे आम्हीही मानकरी,पुजाऱ्यांना तिकडे येऊ देणार नाही असा संतप्त धमकी वजा इशारा त्यांनी यावेळी बोलताना दिला यावर जमलेल्या शेतकऱ्यांपैकी नागनाथ बारकुल,समाधान बारकुल या शेतकऱ्यांनी यात्रे नंतर शेताची साफ सफाई करुन देण्यात यावी अशी मागणी केली.
यावेळी बैठकीला ग्रामपंचायत सरपंच सुजाता देशमुख उपसरपंच शगणेश बारकुल माजी सरपंच विकास भाऊ बारकुल माजी जि.प.सदस्य मदन बारकुल ग्रामपंचायत सदस्य गटविकास अधिकारी चकोर सपोनी. दिनकर गोरे महवितरण शाखा अभियंता स्नेहा कोंगलवार,कळंब आगारप्रमुख गावातील ग्रामस्थ अमराई व येडेश्वरी मंदिर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
या बैठकीला उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांनी यात्रा काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आरोग्य विभागाकडून मंदिर परिसरात एक तर आमराई परिसरात एक तर आरोग्य केंद्रात एक बूथ तर वैद्यकीय अधिकारी१९,पर्यवेक्षक १०,आरोग्य सेवक २०,सेविका १०,परिचर १० अतिरिक्त कर्मचाऱ्यांची मागणी केल्याचे यांनी सांगितले
महावितरण कडून यात्रेसाठी परिसरातील रोहित्र,विद्युत वाहिन्या,दुरुस्तीची कामे हाती घेतली असून पर्यायी व्यवस्था येडशी येथुन उपलब्ध होईल असे सांगितले.
परिवहन विभागाकडून यात्रा स्पेशल म्हणून धाराशिव विभागाच्या २००,तर लातूर,बीडच्या १५० बसेस ची मागणी केल्याचे यांनी सांगितले.
पोलिस प्रशासनाचे सापोनि दिनकर गोरे यांनी यात्रेला उपविभागीय अधिकारी १,सापोनी,पोनि ४५,पुरुष पोलिस ३५०,महिला १५०,होमगार्ड ३००,महिला होमगार्ड १५० असा पोलिस बंदोबस्त मागणी केली असल्याचे सांगत इतर भागातील अनेक यात्रा विविध व्यवसायिकांना मानधन निनामंत्रन देवून यात्रा भरवल्या जातात मात्र येडेश्र्वरी देवीची यात्रा म्हणजे उत्स्फूर्त व्यवसायिकांनी,भाविकांनी भरणारी यात्रा असल्याचे त्यांनी सांगुन स्थानिक ग्रामस्थांनी या यात्रेचे पावित्र्य जपावे असे सांगितले.
इतर बैठकीत चर्चेचे मुद्दे.
देवीच्या मंदिर रस्त्याची माहिती देताना जि.प.बांधकाम विभागाने मंदिर रस्त्याचे ५००.की.मी.मंजुरी मिळाल्याचे सांगुन यात्रेपूर्वी काम पूर्ण केले जाईल असे सांगितले,माजी सरपंच विकास बारकुल यांनी आ.राणाजगजिसिंह पाटील यांच्या प्रयत्नातून मंदिर रस्त्याला जिल्हा नियोजन निधीतून एक कोटी निधी मंजूर झाला असून पालक मंत्री तानाजी सावंत यांना ग्रामपंचायतने दिलेल्या निवेदनातून हा निधी मंजूर झाल्याचे सांगितले,मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने केल्या जाणाऱ्या नियोजनाची माहिती ट्रस्टचे समाधान बेदरे यांनी देवून आमराई मंदिर परिसरातील शेतकऱ्यांच्या मागणी नुसार ट्रस्ट शेताची साफ सफाई करुन देईल अशी माहिती त्यांनी दिली,विलास थोरबोले यांनी यात्रेनंतर पालखी परत जाताना पालखी पूढ़े डी जे लावण्याची प्रथा बंद करावी पालखी मिरवणुकीत नाचनाऱ्या दारुड्यांमुळे महिला भाविकांना त्रास होते.या ही प्रथा बंद केली जाईल असे माजी सरपंच विकास बारकुल यांनी सांगितले.
यात्रा काळात आमराई परिसरात गावठी हातभट्टीची दारु विक्रीची शेकडो दुकाने थाटली जातात महसूल भरणारी परवाना धारक बार,देशी दारु दुकाने यात्रेत बंद आणि हातभट्टी सुरु यावर पोलिस प्रशासनाने पायबंद घालावा अन्यथा या लोकांना हुसकावून लावण्यासाठी गावातील तरुणांना हुसकावण्याचे काम करावे लागेल याला सर्वस्वी पोलिस प्रशासन जबाबदार राहील असे सुहास बारकुल यांनी बैठकीत बोलताना नमूद केले.
. येडेश्र्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या प्रशासकीय नियोजन बैठकीचे आदेश काढून बैठकीला गैर हजर राहणाऱ्यावर कारवाईचा इशारा देणाऱ्या दस्तुरखुद्द तहसीलदारांसह महसुल विभागाचे वरिष्ठ अधिकारी कर्मचारी संपामुळे गैरहजर राहिले.
0 Comments