Subscribe Us

जागतिक महिला दिनानिमित्त रक्त तपासणी शिबिराचे आयोजन.


धाराशिव/ तेरणेचा छावा:-  ८ मार्च रोजी जागतिक महिला दिनाचेे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्त्या सौ.अर्चनाताई अंबूरे यांनी रक्त तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
     30 वर्षाच्या पुढील महिलांनी वर्षाला एकदा  रक्ताची तपासणी व सर्व चाचण्या करून घेणे अत्यावश्यक असते जेणेकरून भविष्यात होणारे आजार रक्ताच्या चाचण्यामुळे वेळीच निदर्शनास येतात व महिलांचे शारीरिक आरोग्य तंदुरुस्त ठेवण्यासाठी खास महिला दिनाचे औचित्य साधून मेट्रोपॉलिसी या नावाजलेल्या पॅथॉलॉजी लॅबने सर्व चाचण्या अत्यल्प दरात उपलब्ध करून देणार आहेत तरी धाराशिव जिल्ह्यातील महिलांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहनही सामाजिक कार्यकर्त्या सौ अर्चनाताई अंबुरे यांनी केले आहे.
        यामध्ये टू हेल्थ सिल्वर पॅकेज, टू हेल्थ गोल्ड पॅकेज,टू हेल्थ प्लॅटिनम पॅकेज, वन टू हेल्थ डायमंड पॅकेज असे खास पॅकेजेस शिबिरासाठी   असणार आहेत.तरी ज्यांना रक्त तपासणी करावयाची आहे. त्यांनी धाराशिव येथील जिजाऊ चौकातील वॉश मार्ट या ठिकाणी नाव नोंदणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments