दहिफळ / तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथील रहिवासी तसेच कळंब आगारात ड्रायव्हर म्हणून कार्यरत असलेले शिवाजी मते यांचं तिव्र ह्दय झटक्याने निधन झाले.
ड्युटीवर जात असताना दहिफळ येथील चौकात जागेवर अचानक झटका आला.उपचारासाठी बार्शीला दवाखान्यात घेऊन जात असताना वाटेत त्यांची प्राणज्योत मालवली.
ही घटना समजताच सारा गाव शोकसागरात डुबुन गेला व्यापारी वर्गाने सगळी दुकाने बंद ठेवली होती.
शिवाजी भागवत मते हे हरहुन्नरी कलाकार होते.गावातील सार्वजनिक गणेशोत्सव, हरिनाम सप्ताह, खंडोबा यात्रा असो की शारदीय नवरात्र उत्सव असो, लग्न कार्य असो वेळ काढून ते प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होत असत.घरचा कार्यक्रम असल्यासारखे स्वतः पुढाकार घेऊन तो कार्यक्रम आनंदात पार पाडत असत.
नाटकात त्यांनी विविध भुमिका साकारल्या होत्या.तसेच गायक म्हणून ते परिसरात नावलौकिक होते.
एस टी महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत ते सहभागी होत असत.राज्यस्तरीय स्पर्धेत कळंब आगाराला पुरस्कार मिळवून दिला होता.
गावपातळीवर तर त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग होताच परंतु जिथं जिथं संधी मिळल तिथे माईकचा ताबा घेऊन आपली कला सादर करत असायचे.
सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आज काळाने हिरावले आहे.
हजारोंच्या उपस्थितीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.यावेळी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, दोन मुली नातवंडे एक भाऊ पुतने असा परिवार आहे.
0 Comments