Subscribe Us

येरमाळा येथिल विद्यानिकेतन विद्यालयात बालस्नेह संमेलनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न.


उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
विद्यानिकेतन प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येरमाळा येथे दोन दिवसीय स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात प्रथम दिवशी केजी ते चौथी (इंग्रजी माध्यमा)पर्यंत विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री. एस.पी. पाईकराव न्यायाधीश, श्री.श्रीपाल बनसोडे साहेब निरीक्षक, डॉ. संदीप तांबरे, विशाल बारस्कर, वैभव बारस्कर सरवती हायस्कूल येरमाळा, पत्रकार दत्ता गायके, दत्ता बारकुल, अमोल बारकुल सर तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सचिन पाटील सर, स्वाती पाटील, सचिव प्रभावती पाटील ,  सदस्य भागवत माने , बिपिन पाटील ,  नितीन पाटील ई मान्यवर उपस्थित होते. तसेच शाळेचे प्रशासकीय अधिकारी अनिल डोके यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाची प्रस्तावना श्री. विलास टेकाळे सर यांनी केली. शाळेचा वार्षिक अहवाल सौ. प्रियांका काकडे यानी सादर केला . कार्यक्रमाची सुरुवात श्रीम.अमृता चौधरी यांनी स्वागत गीत गाऊन केले. स्नेहसंमेलन कार्यक्रमात मान. न्यायाधीश साहेबांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यात विद्यार्थ्यानी श्री गणपती गीत, देशभक्ती पर गीत, मराठी गीत , आई येडेश्र्वरी गीत , हिन्दी गीत ,  नाटक. शिव छञपती ,  शिवाजी महाराज गीत अशा सर्व गीतांचा समावेश होता. स्नेहसंमेलन कार्यक्रमात शाळेतील सर्वच विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला . शाळेचे क्रीडांगण पालक व ग्रामस्थांनी भरगच्च भरले होतें . ह्या  स्नेह संमेलनसाठी  वर्ग शिक्षक श्रीम. कुमोदिनी  देशमुख, पाळवदे , नैना देशमुख , प्रियंका काकडे, सुरेखा शिंदे, माळी घेवारे, जाधव मॅडम सहकार्य लाभले. तसेच प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
दिवस दुसरा 
प्राथमिक व माध्यमिक विद्यालय स्नेह संमेलानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.  यात पहिली ते नववी विद्यार्थ्यानी सहभाग नोदविला या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सौ सुजाता श्रीकांत देशमुख मॅडम सरपंच ग्रामपंचयत  येरमाळा , श्री.श्रीधर भवर सर चेअरमन प्रियदर्शनी बँक ,  
सुधीर (अण्णा)पाटील संस्थापक आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ  ,समाजसेवक रणजित बारकुल , डॉ. रमेश दापके अध्यक्ष कुलस्वामी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मनाबाद. , डॉ. अर्शद रझवी प्राचार्य बील गेट्स कॉलेज उस्मानाबाद व संस्थेचे अध्यक्ष श्री सचिन पाटील सर , प्रभावती पाटील  , स्वाती पाटील उपस्थित होत्या.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री विलास टेकाळे सर यांनी केले. शाळेचा वार्षिक अहवाल सौ. उषा अमोल बारकुल यांनी केले . या कार्यक्रमात प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. वर्षा पवार, वाघमारे, किर्ती गपाट, दिपाली पावर ,  विजय ओव्हाळ, सचिन शिंदे,योगेश कापसे सर यांचे सहकार्य लाभले. तसेच संजय बांगर , महेश जाधव , नितीन पाटिल ,अजय बाराते, गणेश दिवाणे, पिंटू कात्रे, शकील भई, पिंटू शशेदलकर , राजु काळे इ. सहकार्य लाभले. सूत्र संचलन सुशेन पाटील व अमृता चौधरी यांनी केले. 
 पालकांचा बहुसंख्येने उपस्थित होते

Post a Comment

0 Comments