बाभळगाव/ तेरणेचा छावा:-
जलजीवन मिशन अंतर्गत नव्याने मंजुर झालेल्या ८४ लक्ष रु च्या पाणीपुरवठा योजनेच्या टाकीचे भुमीपुजन शालेय विद्यार्थीनी कु.अमृता सोमनाथ जमाले हिच्या हस्ते व गावातील जेष्ठ नागरीक अंगद तात्या वाघमारे, पांडुरंग पाटील, नानासाहेब वाघमारे,बाबासाहेब वाघमारे, इंजिनिअर किरण मोरे यांच्या हस्ते नारळ फोडून शुभारंभ केला. तसेच प्रा. तुषार वाघमारे यांच्या हस्ते जेसीबी ॲापरेटर वरपे यांचा सत्कार करण्यात आला.
८४ लक्ष रुपये खर्च असलेल्या या योजनेतून जुणी पाणीपुरवठा विहीर, टाकी व नवी विहीर व टाकी यांचे सामाईकीकरण करुन बाभळगांवसाठी पाण्याची टाकी ते गांव, गावअंतरर्गत व गावाच्या विस्तारीत भाग मुक्ताई नगर, मेसाई वस्तीपर्यंत पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा करणार येणार असुन प्रत्येक कुटुंबाला नळ जोडणी देण्यात आहे.
याप्रसंगी प्रेमनाथ वाघमारे, शरद वाघमारे, राजेंद्र जमाले, शेषेराव वाघमारे, आश्राम वाघमारे,पांडुरंग वाघमारे,श्रीकांत वाघमारे,ग्रामपंचायत पदाधीकारी,कर्मचारी, ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते.
0 Comments