शेतकऱ्यांच्या ताटातील खाण्याचा राजरोजपणे सुरू होता हा प्रकार
तेरणेचा छावा/ उस्मानाबाद:-
शेतजमिनीत लागवड केलेल्या सीताफळ फळ बागेसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना अंतर्गत मजुरांचे रोजगार मंजूर करण्यासाठी दिनाक 22/ 11 /2022 रोजी पंचा समक्ष 3600 रुपये लाचेची मागणी करणारे कळंब पंचायत समितीतील कंत्राटी तांत्रिक सहाय्यक सचिन अनंतराव अडसूळ व अडसूळवाडी येथिल कंत्राटी रोजगार सेवक बबन सुदाम शिंदे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने कारवाई केली आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेत रोजगार सेवकापासून ते मस्टरकाढणाऱ्या अधिकाऱ्यापर्यंत पैसे मागण्याचा हा काही नवीन प्रकार नाही हा प्रकार कित्येक दिवसापासून चालू आहे पैसे देण्यास शेतकऱ्यांनी नकार दिल्यास काहीतरी त्रुटी काढणे व इतर कारणे दाखवून त्याचे मस्टर काढले जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने पैसे द्यावे लागतात ही वस्तुस्थिती आहे.
नूतन जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंम्बासे यांनी तुती लागवड व फळबागेसाठी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींना विशेष ग्रामसभा घ्यायला लावून जागृती केली व ते स्वतःअनेक ग्रामसभेला उपस्थित राहून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन तुती लागवड व फळबागेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून जनजागृती करून मार्गदर्शन करत आहेत.परंतु प्रशासनामधील एक भ्रष्ट यंत्रणा शेतकऱ्यांच्या ताटातील खाण्यासाठी आसुसलेले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रोजगार हमी योजनेतील भ्रष्ट यंत्रणा मोडीत काढून गाव पातळी पासून शेतकऱ्यांना लुटणाऱ्या या लुटारू टोळीना आवरण्याची जबाबदारी नूतन जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंम्बासे पार पाडतील अशी जनतेतून अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सापळा अधिकारी म्हणून विकास राठोड पोलीस निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभाग उस्मानाबाद यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलिस अंमलदार इफ्तेकार शेख ,मधुकर जाधव , सचिन शेवाळे , विशाल डोके हे सहभागी होते.
0 Comments