राजधानी दिल्ली येथे होणार पुरस्कार गौरव समारंभ.
उस्मानाबाद/ तेरणेचा छावा:-
गौर तालुका कळंब येथील महिला पेंटर असलेल्या वर्षा विजय कांबळे यांना लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने देण्यात येणारा "सावित्रीची लेक "हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
लोकशाही लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती नवी दिल्लीच्या वतीने शैक्षणिक, कला , क्रीडा , सांस्कृतिक, सामाजिक , राजकीय , प्रशासकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
वर्षा विजय कांबळे या ग्रामीण भागात राहणाऱ्या . महिलेने स्वतःच्या व कुटुंबाच्या पोटापाण्यासाठी मेहनत व परिश्रमाने पेंटिंग क्षेत्रात शिरकाव करून कलर कामातील सर्व खाच- खळगो अवगत करून परिपूर्ण ज्ञान मिळवून स्वतःचा पेंटिगचा व्यवसाय सुरू केला आहे.त्या स्वतः रंगकाम , टेक्चर , डिझाइनिंग ची कामे करतात तसेच मोठमोठी कामे कारागिराबरोबर त्या स्वतःही करतात ,त्यांच्या कलर कामातील जिवंतपणामुळे त्यांना आजूबाजूच्या जिल्ह्यातूनही काम मिळत आहे.त्यांच्या या कामामुळे पुणे येथील वृंदावन फाउंडेशन व विवेक फाउंडेशन यांनी 8 मार्च 2022 महिला दिनी जनाई -मुक्ताई भूषण पुरस्कार 2022 देऊन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक पुणे येथे गौरव करण्यात आला होता. पुरस्कार मिळाल्या बद्दल जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था व महिला बचत गटांनी त्यांचा सत्कारही केला होता. कलेच्या क्षेत्रात मिळवलेल्या या प्रावीण्याबद्दल व त्यांच्या कामाची दखल राजधानी दिल्ली येथील लोकशाहीर जनकल्याण सेवा समिती यांच्याकडून 3 जानेवारी 2023 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी "सावित्रीची लेक" हा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे.
पुरस्कार जाहीर होताच मित्रपरिवार ,नातेवाईकासह जिल्हाभरातून त्यांचे कौतुक होत आहे.
0 Comments