जिल्हाधिकारी , जि. प मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन सादर.
येरमाळा/तेरणेचा छावा:- कळंब तालुक्यातील भोसा या गावाला जाणाऱ्या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे भोसा या गावाला मुख्य रस्ता एन एच 211 सोलापूर औरंगाबाद पर्यंत रस्ता उपलब्ध नसल्यामुळे गावाकऱ्यांचे खुप हाल होतात सदर गावा मध्ये मुख्य बाजार पेठ, दळण वळण व्यवस्था, रोजगार, मार्केट, शैक्षणिक, वैद्यकीय सेवाची अनास्था असल्याकरणाने गावातील हजारो विद्यार्थी, महिला, पुरुष, वृद्ध नांगीरिकांना आसपासच्या गावावरती अवलंबून राहावे लागत असल्यामुळे मुख्य रस्ता NH211 सोलापूर -औरंगाबाद महामार्गाला भोसा गावापासून जोडणारा रस्ता गेल्या 25वर्षांपासून अत्यंत जीर्ण आणि दयनीय अवस्थेत असल्यामुळे ग्रामस्थ्यांचे खुप हाल होत आहेत त्याच्याच परिणाम स्वरूप विद्यार्थ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होत आहेत त्यामुळे शिक्षणाचे प्रमाण देखील कमी होत आहे आणि सदर गावामध्ये कोणताही दवाखाना उपलब्ध नसल्यमुळे वेळेत उपचार अभावी अनेक गंभीर स्वरूपाच्या घटना घडल्या आहेत व भविष्यात घडण्याचा मोठा धोका होऊ शकतो. भारत देशाच्या स्वातंत्र्यच्या 75 वर्षानंतर संपूर्ण देश स्मार्ट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत असताना आजही ग्रामीण भागात रस्त्यासारख्या मूलभूत व्यवस्था नसल्यामुळे सदर गावात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा उपलब्ध होताना दिसत नाही ही अत्यंत खेदजनक बाब आहे तरी सदर गावाच्या रस्ता येत्या 48 तासात दुरुस्त करून एसटी सेवा उपलब्ध करून न दिल्यास लहुजी शक्ती सेना या देशव्यापी आक्रमक संघटनेमार्फत अत्यंत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नास प्रशासन स्वतः जबाबदार राहील असे या निवेदनात नमूद करण्यात आले
या वेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहित भाऊ खलसे जिल्हा कार्याध्यक्ष संतोष भाऊ मोरे जिल्हा संपर्कप्रमुख निखिल भाऊ चांदणे लहुजी शक्ती सेनेचे मुकेश भाऊ शिंदे विशाल भाऊ कसबे हे उपस्थित होते
0 Comments