कळंब/ तेरणेचा छावा: - तुमच्यात दडलेल्या घटकांचे आत्मचिंतन करून आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांच्या आधारे इतरांशी कसल्याही प्रकारची तुलना न करता विद्यार्थ्यांनी आलेल्या संधीचे सोने करावे असे प्रतिपादन खामसवाडी येथील जिल्हा परिषद प्रशालेचे सहशिक्षक डॉ.अशोक शिंपले यांनी केले.
श्री.भैरवनाथ निसर्ग मंडळ संचलित डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्था व भैरवनाथ अध्यापक विद्यालयात दि.१९ नोव्हेंबर व्यक्तिमत्त्व विकास,विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम प्राचार्य सतिश मातने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्येची देवता सरस्वती माता व पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलननाने झाली.
यावेळी प्रबुद्ध रंगभूमी बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष सुभाष घोडके लिखित जागर संविधानाचा हे पथनाट्य पुस्तिका संविधानाच्या माहितीसाठी वाटप करण्यात आले.तसेच यावेळी विजतंत्री,तारतंत्री ह्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमाच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ.अशोक शिंपले पुढे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आधुनिक ज्ञान घेवून स्मार्ट फोनच्या माध्यमातून अभ्यास करून विकासात्मक धोरणाचा अवलंब करून स्वतःच्या पायावर उभे राहुन मन लावून अभ्यास करून आपल्या बुद्धीला विज्ञानाची जोड लावून आनंद,यश प्राप्त करावे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माधवसिंग राजपूत यांनी वेळेला महत्त्व देवून सुट्टीच्या दिवसात सकारात्मक दृष्टीने अभ्यासाचे चिंतन मनन केले असता आत्मविश्वासाने कार्य केले असता विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे. करंजकल्ला येथील जि.प.प्राथमिक शाळेतील उपक्रमशील शिक्षक उत्तम ढेपे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी गोड बोलून चुकीचा मार्ग दाखविणाऱ्या लोकांपासून सावध राहून मन लावून चिकाटीने अभ्यास करून प्रयत्नशील राहिले पाहिजेत.
भैरवनाथ औद्योगिक संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या परिस्थितीची जाणीव ठेवून कुठल्याही क्षेत्रात यश प्राप्त करावे असे आवाहन केले.
कोणत्याही कामाची लाज न बाळगता विद्यार्थ्यांनी आपली प्रशिक्षण संस्था समजून ती अधिकाधिक विकसित कशी होईल यासाठी प्रयत्नवादी रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांनी केले.
याप्रसंगी प्रा.मोहिनी शिंदे,निदेशक सागर पालके,निदेशक विनोद जाधव,विनोद कसबे सह सर्व विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक निदेशक अविनाश म्हेत्रे तर सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके यांनी केले तर आभार प्रा.अतिश वाघमारे यांनी मानले.
0 Comments