Subscribe Us

डेंटल इंशोरंन्स ही काळाची गरज-डॉ.नरेंद्र काळे


कळंब/ तेरणेचा छावा:-
    डॉ.सुप्रिया पाटील-चौधरी यांच्या शाश्वत दातांच्या दवाखाण्याचे उद्घाटन महाराष्ट्र राज्या दंत परिषद अध्यक्ष मा.डॉ.नरेंद्र काळे यांच्या अध्यक्षतेखाली व डॉ. अनिरुद्ध पावले यांच्या प्रमुख उपस्थितीत ह.ब.प. प्रकाश महाराज बोधले यांच्या शुभहस्ते पार पडले.
     यावेळी डॉ.अशोकरावजी मोहेकर, कळंब शहराला अनेक वर्ष वैद्यकिय सेवा देनारे डॉ. बी.एम डिकले,डॉ.बी.डी.मुंदडा यांची तसेच डॉ. अभिजीत जाधवर, ॲड.दत्ता पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
        प्रसंगी बोलताना डॉ.नरेंद्र काळे यांनी दात व मुख आरोग्याविषयी अधिक जनजागृतीची गरज असुन, याबाबतीत शासन व्यवस्थेत अनास्था असल्याची खंत व्यक्त केली. रुग्ण दातांच्या आरोग्यावर गांभिर्याने लक्ष देत नसुन उपचार महाग असल्याच्या भ्रमात आहेत. वास्तविक दृष्ट्या भारत हा जगातील सर्वात कमी दरात दंतोपचार मिळणारा देश असल्याचे सांगितले. इतर इंशोरंसप्रमानेच डेंटल इंशोरंस ही काळाची गरज झालेली असुन येणाऱ्या काळात आरोग्य वीमा सेवा देणाऱ्या कंपण्यांमार्फत ही सेवा सुरु करावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यात यश आले तर अनेक अजारांबाबतीत रुग्णांना आर्थिक संरक्षण मिळनार आहे.
प्रास्थाविकात डॉ.सुप्रीया चौधरी यांनी ग्रामीण भागात दात व मुख आरोग्यास गांभीर्याने घेतले जात नाही, परिनामी पुढे अशा रुग्णांना अनेक आरोग्यविषयक समस्यांचा सामाना करावा लागतो. कॅन्सर हा एक प्राणघातक आजार असुन यात भारतमध्ये तोंडाच्या कॅंसरचे प्रमाण मोठे आहे. रुग्ण आर्थिक परस्थितीमुळे आजार लहान असताना दुर्लक्ष करतात,परंतु वेळीच घेतलेली काळजी भविष्यात मोठी हानी टाळली जाऊ शकते. शाश्वत दातांच्या दावाखाण्याच्या माध्यमातुन कमीत कमी दरात सर्वोत्तम उपचार देण्यात येणार असल्याचे सांगितले.
           चौधरी बाल रुग्णालयाचे संचालक डॉ.शाम चौधरी यांनी आम्ही कळंब सारख्या ग्रामीण भागातही बाल रुग्ण व दंतोपचार क्षेत्रात माफक दरात अत्याधुनीक तंत्रज्ञान मार्फत सेवा पुरवण्यासाठी कटीबद्ध असुन. करोना या जागतीक महामारीच्या काळातही सामाजिक भान व लोकांच्या गरजेपोटी कोवीड रुग्णांना सेवा देण्याचा निर्णय घेतला व जवळपास २०० पेक्षा जास्त सामान्य, गंभीर, अतिगंभीर रुग्णांना यशस्वी सेवा दिली. 
   प्रसंगी ह.ब.प.प्रकाश महाराज बोधले, मा.डी.के.कुलकर्णी, डॉ.अंकुश पाटील,डॉ.सुशील अडसुळ आदी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.तुषार वाघमारे यांनी केले तर डॉ.शाम चौधरी यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments