Subscribe Us

वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी धाराशिव जिल्ह्यातून 20,000 हजार शिवसैनिक दसरा मेळाव्यास जाणार. - सुरज साळुंखे


  धाराशिव / तेरणेचा छावा:-
      वंदनीय हिंदु हृदय सम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी मुंबई येथील बीकेसी बांद्रा मैदानावर बुधवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार एकनाथजी शिंदे व राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्यासह इतर मान्यवर मंत्री व नेत्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या भव्य दसरा मेळाव्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील 20,000 शिवसैनिक जाणार आहेत अशी माहिती शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी दिली आहे 
     मुंबईतील बीकेसी मैदानावर विजयादशमी दस-याच्या समुहूर्तावर या मेळाव्यासाठी धाराशिवधाराशिव जिल्ह्यातील आठही तालुक्यातून हजारो शिवसैनिक  त्यामध्ये धाराशिव - कळंब मतदारसंघातील शिवसैनिक ४०० क्रुझर व  ५० टेंपो ट्रँव्हलर , भूम - परंडा - वाशी मतदार संघातील शिवसैनिक ७०० ( सातशे ) क्रुझर , उमरगा - लोहारा - तुळजापुर मतदारसंघातील शिवसैनिक ७०० क्रुझर असे एकूण १,८५० वाहनांतुन २०,०००  ( वीस हजार ) शिवसैनिक  मुंबईकडे विविध मार्गाने व वाहनांनी रवाना होणार आहेत. राज्यात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रखर हिंदुत्वाच्या विचाराचे शिवसेना भाजपा युतीचे सरकार आल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या दसरा मेळाव्यास राज्यातील लाखो शिवसैनिक मुंबईकडे रवाना होणार आहेत धाराशिव जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक देखील या दसरा मेळाव्यासाठी रवाना होत आहेत राज्याचे आरोग्य मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील हजारो शिवसैनिक मुंबईतील बीकेसी मैदानाकडे दसरा मेळाव्यासाठी रवाना होणार आहेत या दसरा मेळाव्या साठी जिल्ह्यातील हजारो शिवसैनिकांनी बुधवार दिनांक 5 ऑक्टोंबर रोजी बीकेसी मैदान बांद्रा मुंबई येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंखे यांनी केले आहे .

Post a Comment

0 Comments