गौर/ तेरणेचा छावा:-
श्री गणेश उत्सव व महालक्ष्मी सणानिमित्त या वर्षी गणेश देशमुख व मित्रपरिवार वतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती..स्पर्धेला खुप चांगला प्रतिसाद मिळाला.असून पहिल्याच वर्षी एकूण 55 स्पर्धकांनी सहभाग घेतला..यात प्रथम क्रमांक-सौ.स्वाती प्रभाकर लंगडे, 2 525 रु द्वितीय क्रमांक -सौ. वर्षा विजय कांबळे 2020 रु तृतीय क्रमांक- सौ.संजीवनी शिवाजी वाघमारे यांना १५१५ रुपयांचे बक्षीस देऊन शुक्रवार ( दि. 30 सप्टेंबर) रोजी गौरविण्यात आले .
याप्रसंगी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक आलेल्या स्पर्धक महिलांचा भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते बक्षीस देऊन गौरव करण्यात आले.यावेळी विनोद गपाट,प्रवीण सिरसाट, डॉ. प्रशांत पवार,तात्यासाहेब देशमुख,भाऊसाहेब देशमुख,प्रभाकर लंगडे,शिवाजी महाराज देशमुख,धनंजय देशमुख,रामचंद्र पिंटू माळी,सुरेश लंगडे,संतोष देशमुख,अशोक देशमुख,अक्षय लंगडे, सुदाम गोरे,निरंजन देशमुख,शैलेश राऊत,श्रीकांत लंगडे,प्रताप देशमुख, विशाल तौर,विजय ताकपिरे,भैय्या वाघमारे,विक्रम कोरडे व ग्रामस्थ,महिला भगिनी उपस्थित होत्या.
तसेच यावेळी गौर गावासाठी गेल्या वर्षभरापासून नॅशनल बँकेची शाखा व्हावी ही प्रमुख मागणी गणेश देशमुख व मित्र परिवाराची आहे.त्यासाठी सर्व कागदोपत्री प्रकिया पूर्ण केली आहे..तरी त्यासाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करावा अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष सह पदाधिकाऱ्यासमोर लावून धरली.याचबरोबर पीक विमा साठी विशेष प्रयत्न केल्याबद्दल आमदार राणा दादा यांच अभिनंदन केलं..
कार्यक्रमाचे प्रस्ताविक गणेश देशमुख तर आभार धनंजय देशमुख यांनी मानले..
0 Comments