Subscribe Us

सुरेश पाटील तुम्ही जाल बोलून पण आमचे कार्यकर्ते जातील करून. युवासेना कार्यकारिनी सदस्य- अविनाश खापे पाटील


धाराशिव / तेरणेचा छावा:-
राष्ट्रवादीचे सुरेश पाटील यांनी शनिवार (दि. 1ऑक्टोबर) रोजी  गुळ पावडरच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ सभेत मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात वक्तव्य केले होते या वक्तव्याला जोरदार प्रत्युत्तर युवासेना कार्यकारी सदस्य अविनाश खाते पाटील यांनी दिले आहे.
सुरेश पाटील यांच समाजाविषयी  असलेलं योगदान किती हे 2019 च्या निवडणुकीत समाजाने दाखवलंय.
    मा ना तानाजी सावंत हे समाजाविषयी काय बोलले आणि त्यानंतर त्यांनी दिलेलं स्पष्टीकरण आणि त्यांचं समाजाविषयीच योगदान हे समाजाला माहीत आहे.
    अलीकडच्या काळात राजकीय वादात समाजाला घेऊन पडायचं ! आपल्या विरोधकांच्या नेत्याला वादात घेऊन पडायचं , वाद असतो गल्लीतला मात्र दिल्लीतल्या नेत्याला भिडायचं . असंच काहीसं समीकरण काही अंशी आणि काही लोकांकडून पाहायला मिळत आहेत् यातलाच एक बालिशपणाचा कळस म्हणजे सुरेश पाटील .
    सुरेश पाटील याचं वय वाढलं पण बुद्धी मात्र भ्रष्ट झाल्याचे या मारामारीच्या भाषेवरून दिसून येत आहे ।
     सत्ता ही जनतेची कामे करण्यासाठी आहे आणि ती कामे अहोरात्र तानाजी सावंत  करत आहेत । बोलताना तोंड सांभाळून बोलावे नाहीतर बालीश आव्हानाला प्रति आव्हान देणे हे सत्तेला शोभत नाही परंतू या पुढे जर असे घडले तर तुम्ही मात्र बोलून जाल पण आमचे कार्यकर्ते करून जातील याची नोंद असावी .असा टोला युवा सेना कार्यकारणी सदस्य अविनाश खाते पाटील यांनी मारला आहे.

Post a Comment

0 Comments