मंगरूळ तेरणेचा छावा:-
मंगरूळ तालुका कळंब येथील
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिक्षण घेत असलेल्या विविध उपक्रमासाठी शाळेस मैदान कमी असतानाही शाळेतील सर्व शिक्षक खो-खो कबड्डी हॉलीबॉल अशा सांघिक खेळाचा व गोळा फेक थाळीफेक भालाफेक अशा वैयक्तिक खेळाचा सराव अतिशय जोमाने होत असल्याचे पाहून गावातील दानशूर क्रीडाप्रेमी व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष तानाजी (काका ) गोपाळ जाधव, यांनी खेळातील सर्व विद्यार्थ्यांना खेळाचे गणवेश भेट म्हणून देण्यात आले. याचे पालक वर्ग , विद्यार्थ्याकडून, व समाजाच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक मुंडे जी डी, .कांबळे एस जी, गायकवाड एस एस, जगताप बी एम,अकोस्कर बी व्ही, रेखाताई रीतापुरे , ढेपे मॅडम, डिकले मॅडम, घुटे मॅडम, भोरे मॅडम उपस्थित होते.
0 Comments