ग्रामीण भागाची आर्थिक नाडी अशी ओळख बनलेल्या मोहेकर मल्टीस्टेट ची
संघर्षातुन समृद्धीकडे यशस्वी वाटचाल
मोहा : - तेरणेचा छावा:-
कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टटेची ११ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार ( दि. 30 सप्टेंबर )रोजी ग्राम दैवत हनुमान मंदिराच्या सभागृहामध्ये उत्साहात पार पडली सभेच्या अध्यक्ष स्थानी मोहेकर उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे मार्गदर्शक तथा ज्ञान प्रसार मंडळाचे सचिव डॉ. अशोकराव मोहेकर होते .
याप्रसंगी मोहेकर उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत मडके संस्थेचा संस्था स्थापनेस्थापनेपासुन ते आजपर्यंतचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला
संस्थेची स्थापना सन २०१२ मध्ये झाली असुन संस्थेची पहिली शाखा कळंब येथे सुरू केली. जनतेच्या विश्वासावर ,पारदर्शक कारभार, च्या जोरावर मल्टीस्टेटने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेतली आज या संस्थेच्या २४ शाखा कार्यरत असुन संस्थेने १६० कोटीचा ठेवीचा टप्पा पार केलेला आहे. संस्थेच्या सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात संस्थेचा एकुण व्यावसाय २८३० कोटीचा झाला तर ढोबळ नफा १२ कोटी ,संस्थेचे सभासद ४५ हजाराच्या पुढ़े असल्याचे सांगत.संस्थेच्या सभासदांना ५ टक्के लाभांश याप्रसंगी जाहीर करण्यात आला. तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे बांधकाम मोहा येडशी रोडवरील संस्थेने घेतलेल्या जागेत लवकरच सुरू होणार असल्याचे यावेळी बोलताना सांगीतले.
यासभेस मोहेकर मल्टीस्टेट चे व्हा चेअरमन डॉ ज्ञानोबा जाधव, कार्यकारी संचालक विशाल मडके, संचालक श्रीहरी बोबडे,मोहेकर अॅग्रोचे संचालक बापुराव शेळके, उपसरपंच सोमनाथ मडके,माजी सरपंच बाबासाहेब मडके, पोलीस पाटील प्रकाश गोरे, मनोज जोशी,माणिक आरकडे, देविनंदा फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन अतुल मडके,अशोक मडके,अच्युत मडके, तात्यासाहेब पाटील, तेरणेचे माजी संचालक उद्धव मडके,शेषराव मडके, धनंजय अनंतराव मडके, शेतकी अधिकारी किशोर सावंत,तंटामुक्ती उपाध्यक्ष अकुंश मडके, मोहेकर मल्टीस्टेट चे मुख्य कार्यालय अधिकारी फुलचंद मडके,प्रमोद मडके,श्रीकांत मडके, अतुल मडके,इम्रान शेख ,सुरज मडके, राहुल मडके तसेच कर्मचारी सभासद,ठेवीदार, ग्राहक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमांचे प्रस्थाविक व सूत्रसंचालन बापु जोशी यांनी केले तर आभार मोहेकर मल्टीस्टेट चे कार्यकारी संचालक विशाल मडके यांनी मानले.
0 Comments