मोहा/तेरणेचा छावा:-
मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर मल्टीस्टेट या संस्थेला मंगळवार ( दि.३० ऑगस्ट) रोजी 10 वर्षे पुर्ण झाल्यानिमीत्त 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जनहित डोळ्यासमोर ठेवून संकल्प सिद्धीतून जिद्दीच्या बळावर दहा वर्षांपूर्वी एक बीज मोहा गावात रुजवून सुरू केलेला प्रवास आज 10 वर्षानंतर एक वटवृक्ष म्हणून उभा राहिला आहे. अनेक बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला. तर सर्वसामान्यांना हक्काची बँक उपलब्ध करून देणारे ज्यांच्या अविरत कष्टाची, अमर्याद प्रयत्नाची, अखंड मेहनीतीची,सतत जिद्दीची व संकल्प ते सिद्धी या अतुलनीय कार्य करणारे संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष चेअरमन मा.श्री.हनुमंत (तात्या) मडके यांचा सत्कार संस्थेच्या सभासद तथा कर्मचारी यांच्या वतीने मोहा गावचे पोलीस पाटिल प्रकाश गोरे यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच मोहेकर मल्टीस्टेट चे कर्तव्यदक्ष कार्यकारी संचालक विशाल मडके तसेच संस्था स्थापन झाल्यापासुन संस्थेेसाठी अविरत कष्ट करणारे संस्थेचे मुख्य कार्यालय अधिकारी । फुलचंद मडके, प्रमोद मडके यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सभासद अनंत वीर, मोहेकर मल्टीस्टेटचे मुख्य कार्यालय अधिकारी श्रीकांत मडके,अतुल मडके, इम्रान शेख, सुरज मडके, राहुल मडके, संगीता मडके, रत्नदीप मडके, मोहा शाखेचे शाखाधिकारी सुरज मडके,आयाज पठाण, अक्षय झोरी,दत्तात्रय मडके, मिरा महाजन,अर्चना माळी,मनिषा मडके तसेच संस्थेचे सभासद,कर्मचारी आदी उपस्थित होते.
0 Comments