उस्मानाबद/ तेरणेचा छावा:-
उस्मानाबाद आगाराची उस्मानाबाद लातूर फेऱ्या करणाऱ्या बसची आगारात मेंटेनन्स करत असताना शैक्षणिक कागदपत्राची फाईल पाळी प्रमुख विलास राऊत यांना आढळून आली त्यांनी ती फाईल जवळ घेऊन बघितली असता त्यात महत्त्वाची कागदपत्रे असल्याचे त्यांना दिसून आले तात्काळ त्यांनी वेळ न दवडता त्या फाईल मधील फोन नंबर पत्ता काढून बोलवून कागदपत्रे संबंधित व्यक्तीच्या ताब्यात दिली. ती व्यक्तीही कागदपत्रे गहाळ झाल्यामुळे चिंतेत होती कुठे गहाळ झाली होती त्यांच्या लक्षात येत नव्हते त्यानंतर कागदपत्रासाठी फोन आल्यानंतर त्यांचा जीव भांड्यात पडला व त्यांनी संबंधित मेकॅनिकल व कर्मचाऱ्याचे आभार मानले.यावेळी पप्पू धतुरे , चिलवंत सर्जे, बोचरे स्वच्छक संजय कांबळे उपस्थित होते.
0 Comments